The Kerala temple where thousands of men dress up like women every year for Devi Darshan
देशातील एकमेव मंदिर जिथं पुरुषांना महिलेच्या वेषात मिळतो प्रवेश; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 10:05 PM1 / 10भारताची संस्कृती विविधतेसाठी ओळखली जाते. देशातील मंदिरांमध्ये स्वतःची प्रथा परंपरा आहे, काही मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास मनाई आहे तर काहींमध्ये पुरुषांना जाता येत नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला केरळमधील एका मंदिराविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये पुरुषांना देवीची पूजा करण्याची परवानगी नाही. 2 / 10मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यासाठी महिलांप्रमाणे साडी नेसावी लागते, त्यासोबत साज श्रृंगार करून देवीची पूजा करावी लागते. हे विशेष मंदिर केरळमधील कोल्लम येथे आहे, जे कोट्टनकुलंगारा श्री देवी मंदिर म्हणून ओळखले जाते. 3 / 10मार्च महिन्यात येथे चामयाविलक्कू उत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान पुरुष साडी नेसून आणि स्त्रियांप्रमाणे सजवून मंदिरात जातात आणि देवीची पूजा करतात. उत्सवादरम्यान दक्षिण भारतातील अनेक मेकअप आर्टिस्ट पुरुषांसाठी मेकअप करण्यासाठी येतात. 4 / 10मंदिराच्या बाहेर नियमित स्टॉल लावले जातात जेथे हा मेकअप केला जातो. उत्सवादरम्यान, ज्याचा मेकअप सर्वात खास असेल त्याला बक्षीस देखील दिले जाते. केरळच्या या उत्सवात ट्रान्सजेंडर समुदायातील लोकही सहभागी होऊ शकतात.5 / 10कोट्टनकुल्लंगारा श्री देवी मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे, लोककथांमध्येही मंदिराचा आणि उत्सवाचा उल्लेख आहे. जंगलात खेळत असताना मुलांना नारळ सापडल्याचे सांगितले जाते. तो तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून रक्त वाहू लागले. 6 / 10मुलांनी लोकांना याबद्दल स्थानिक लोकांनी गुरुंना दाखवलं तेव्हा त्यांनी दगडात वनदुर्गाची अलौकिक शक्ती आहे तेव्हापासून इथं मंदिर बांधल्यानंतर लगेच पूजा सुरू झाली पाहिजे. जिथे दगड सापडला म्हणून त्यांनी नारळ, ताडाच्या काड्या, पाने आणि मऊ पाने वापरून मंदिर बांधले.7 / 10येथे पूजेसाठी महिलांच्या वेषात येणाऱ्या पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास भाविकांमध्ये आहे. हा उत्सव मल्याळम मीनम महिन्याच्या आधारे साजरा केला जातो, जो मार्चमध्ये येतो. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं कोणत्याही धर्माची, जातीची व्यक्ती येऊ शकते.8 / 10स्त्रियांच्या वेषात असलेले पुरुष दैवी चमायाविलक्कू धारण करतात आणि प्रमुख देवतेवरील त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून मंदिराभोवती फिरतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. सध्या, हा सण केरळमधील ट्रान्सजेंडर समुदायाचा सर्वात मोठा मेळावा बनला आहे कारण तो त्यांना त्यांची ओळख साजरी करण्यासाठी एक व्यासपीठ देतो.9 / 10मिरवणुकीवेळी आणि प्रार्थना करताना पुरुष चमायविलक्कू (पाच दिव्यांनी पेटलेला दिवा) देखील घेऊन जातात. पुरुषाने महिला म्हणून पूजा केल्याने त्यांना नोकरी, संपत्ती इत्यादी रूपात आशीर्वाद मिळेल अशी भाविकांची श्रद्धा आहे. 10 / 10भारतीय रेल्वेतील अधिकारी अनंत रुपनगुडी यांनी एकदा ट्विट केले होते, त्यात या सणाबद्दल त्यांनी माहिती दिली. यामध्ये पुरुष महिलांचे रूप धारण करतात. ते महिलांचे कपडे घालतात आणि त्यांचा सर्व मेकअप महिलांप्रमाणे केला जातो. हा फोटो ज्या व्यक्तीचे आहे ज्याने या महोत्सवात भाग घेतला आणि स्पर्धेतील मेकअपसाठी प्रथम पारितोषिक जिंकले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications