शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अबब! 682 डबे असलेली जगातील सर्वात लांब ट्रेन, खेचण्यासाठी लागतात 8 इंजिन ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 3:44 PM

1 / 7
World Longest Train: तुम्ही लहानपणी अनेकदा समोरुन जाणाऱ्या रेल्वेचे डब्बे मोजण्याचा प्रयत्न केला असेल. काही ट्रेनमध्ये 15-16 डबे असतात आणि काहींना 25 डबे असतात. आम्ही तुम्हाला एका अशा ट्रेनबद्दल सांगणार आहोत, जिचे डबे मोजून तुम्ही थकून जाल. या ट्रेनची लांबी तब्बल 7 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे, या ट्रेनला 25-50, 100-200 नाही, तर तब्बल 682 डबे आहेत.
2 / 7
682 कोच असलेली ही जगातील सर्वात लांब ट्रेन आहे. या ट्रेनच्या लांबीचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, यात 24 आयफेल टॉवर्स बसू शकतात. ट्रेन इतकी लांब आहे की, खेचण्यासाठी एक-दोन नाही, तर 8 इंजिन जोडलेले आहेत. या ट्रेनचे वजन सुमारे एक लाख टन आहे.
3 / 7
जगातील सर्वात लांब ट्रेनचा रेकॉर्ड 'द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओर' ट्रेनच्या नावावर आहे. ही प्रवासी रेल्वे नाही, तर एक मालगाडी आहे. ही ट्रेन 21 जून 2001 रोजी पहिल्यांदा रुळावर धावली होती. इंजिनपासून शेवटच्या डब्यापर्यंत या ट्रेनची लांबी 7.3 किमी आहे. 8 लोकोमोटिव्ह इंजिन आणि 682 डबे असलेली ही ट्रेन कोळसा वाहतूक करण्यासाठी वापरली जाते.
4 / 7
लांब असण्यासोबतच ऑस्ट्रेलियन BHP आयर्न ओरला सर्वात वजनदार ट्रेनचा खिताब मिळालेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या यांडी माइन ते पोर्ट हेडलँड बीचपर्यंत धावणारी ही ट्रेन 275 किलोमीटरचे अंतर कापते, ज्यामध्ये तिला 10 तास लागतात. ट्रेनची क्षमता 82,000 टन लोह खनिज वाहून नेण्याची आहे.
5 / 7
ऑस्ट्रेलियन BHP Iron Ore ट्रेन ही सरकारी नसून खाजगी ट्रेन आहे. ही BHP च्या खाजगी रेल्वे मार्गावर धावते. कंपनीने लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग आणि ट्रेन तयार केली आहे. मागणी नसल्यामुळे आता या ट्रेनमधील डब्यांची संख्या 270 करण्यात आली आहे. तर, इंजिन 8 ऐवजी 4 पर्यंत कमी केले आहेत.
6 / 7
या ट्रेनने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात लांब ट्रेनला हरवून सर्वात लांब ट्रेनचा किताब पटकावला होता. त्या ट्रेनमध्ये 660 डबे होते. 'माउंट न्यूमन रेल्वे' म्हणून ओळखली जाणारी ती ट्रेन एकच ड्रायव्हर चालवतो.
7 / 7
या ट्रेनने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात लांब ट्रेनला हरवून सर्वात लांब ट्रेनचा किताब पटकावला होता. त्या ट्रेनमध्ये 660 डबे होते. 'माउंट न्यूमन रेल्वे' म्हणून ओळखली जाणारी ती ट्रेन एकच ड्रायव्हर चालवतो.
टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया