शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' ५ व्यक्ती ज्या रातोरात बनल्या कोट्यधीश; मजूर, टॅक्सी ड्रायव्हर श्रीमंत झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 9:25 AM

1 / 10
जर तुमच्या खात्यात अचानक अब्ज किंवा कोट्यवधी रुपये आले तर? पहिल्यांदा विश्वास बसणार नाही. त्यानंतर हे पैसे कुठून आले याचा विचार कराल. त्यावेळी काय करू आणि काय नको अशी परिस्थिती बनेल. परंतु अचानक खात्यात इतका पैसा जमा झाल्यास कुणाचेही मन विचलित होईल, आज आम्ही तुम्हाला ५ अशा लोकांबाबत सांगणार आहोत. जेव्हा मजूर ते टॅक्सी ड्रायव्हर यांच्या बँक अकाऊंटमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले.
2 / 10
यूपीच्या शिवप्रसाद निषादला आयकर खात्याची नोटीस आली. शिवप्रसाद हा मजुरीचे काम करतो. परंतु त्याच्या खात्यातून २२१ कोटींचे व्यवहार झाल्याचे नोटीसमध्ये म्हटलं. २०१९ ला शिवप्रसादचे पॅनकार्ड हरवले होते. त्याच्या मदतीने काहींनी शिवप्रसादच्या नावावर अकाऊंट उघडले आणि पैशांचा व्यवहार केला.
3 / 10
शिवप्रसादच्या बँक खात्यात २ अब्ज २१ कोटी ३० लाख रुपये जमा झाल्याचे कळाले. त्यातून ४ लाख ५८ हजार टीडीएस कापण्याची नोटीस आली. शिवप्रसाद हा मजुर असून दगडे फोडण्याचे काम करतो. त्याच्या खात्यात इतका पैसा कुठून आला याबाबत त्याला माहिती नाही.
4 / 10
एक महिन्यापूर्वी तामिळनाडूच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यावर १-२ नव्हे तर तब्बल ९००० कोटी रुपये जमा झाले होते. खात्यात ९ हजार कोटी जमा झाल्याचा मेसेज बँकेने राजकुमारच्या मोबाईलवर पाठवला. हा मेसेज पाहून राजकुमारला शॉक बसला.
5 / 10
दिवसभर काम करून दुपारी राजकुमार टॅक्सीत झोपला होता. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याने मोबाईल चेक केला. त्यात बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर राजकुमारने विश्वास बसत नाही म्हणून मित्राला पैसे पाठवले. ते मित्रालाही मिळालेही. त्यानंतर ही रक्कम बँकेने चुकीने राजकुमारच्या खात्यात टाकल्याचे पुढे आले.
6 / 10
अलीकडेच चेन्नईमध्ये मेडिकलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला बँकेचा मेसेज आला. त्यात त्याच्या खात्यात जवळपास ७५३ कोटी रुपये जमा झाल्याचे कळाले. करनकोविल इथं राहणाऱ्या मुहम्मद इदरीस तेनामापेटमध्ये एका मेडिकलमध्ये काम करतो.
7 / 10
इदरीसने त्याचा बँक बॅलेन्स चेक करण्यासाठी बँकेचा मेसेज पाहिला तेव्हा त्याच्या खात्यात इतकी रक्कम जमा झाल्याचं कळाले. इदरीसनं याबाबत बँकेला विचारणा केली असता तात्काळ त्याचे खाते सीझ करण्यात आले. त्यानंतर चुकीच्या व्यवहाराने ही रक्कम इदरीसच्या खात्यावर गेल्याचे पुढे आले.
8 / 10
हरियाणातील एका मुजराच्या खात्यावर २०० कोटी रुपये आले होते. विक्रम नावाच्या मजुराचे यस बँकेत खाते होते. जेव्हा विक्रमच्या खात्यावर इतके पैसे जमा झाले तेव्हा त्याला विश्वास बसला नाही. त्यानंतर भाऊ प्रदीप आणि बिना देवी यांनीही बँकेत पैसे जमा झाल्याची खातरजमा केली.
9 / 10
विक्रम ८ वी पास होता, २ महिन्यापूर्वीच त्याला नोकरी मिळाली होती. नोकरीच्या वेळी त्याचे बँक खाते डिटेल्स घेतल्याची माहिती भाऊ प्रदीपने दिली. त्याचा चुकीचा वापर झाला असावा असा अंदाज आहे. हे पैसे कुठून आले हे अद्याप समोर आले नाही. परंतु बँकेने विक्रमचे खाते गोठवले आहे.
10 / 10
चेन्नईमधील तंजावुरच्या गणेशनसोबतही तेच घडले. त्याच्या बँक खात्यात ७५६ कोटी जमा झाल्याचा मेसेज बँकेने पाठवला. परंतु गणेशनने तात्काल बँकेला याबाबत कळवले. त्यानंतर बँकेने त्यांची चूक कबूल करत खात्यातून पैसे परत घेतले. तांत्रिक कारणाने हा घोळ झाल्याचे बँकेने म्हटलं.