The women sniper who kill 309 soldiers of Hitler Nazi force become a legend
अशी महिला जिने हिटलरच्या 309 लोकांचा केला खात्मा, बनली होती जगातील सगळ्यात मोठी स्नायपर By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 1:14 PM1 / 7इतिहासातील असे अनेक किस्से आहेत जे आपल्याला अजिबात माहीत नसतात. काही गोष्टींवर सिनेमे बनतात. पण तरीही काही गोष्टी रहस्यमय राहतात. महायुद्धा दरम्यानच्या तर शेकडो कहाण्या आहेत. त्यातील एका महिलेची कहाणी फारच थक्क करणारी आहे. ल्यूडमिला पवलिचेंको हे नाव तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण इतिहास या महिलेला चांगलाच ओळखतो. 2 / 7ही महिला इतिहासातील सर्वात खतरनाक महिला शूटर(स्नाइपर) मानली जाते. ही इतकी शार्प होती की, तिने जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या नाझी सेनेच्या नाकी नऊ आणले होते. या महिलेला सोव्हिएत संघात हिरो म्हणून ओळखलं जात होतं.3 / 7ल्यूडमिला द्वितीय महायुद्धावेळी सोव्हिएत संघाच्या रेड आर्मीमध्ये एक जबरदस्त स्नाइपर होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी महिलांना आर्मीमध्ये घेतलं जात नव्हतं. पण ल्यूडमिलाने आपल्या खासियतच्या जोरावर सोव्हिएत संघातच नाही तर जगभरात नाव कमावलं.4 / 7असे सांगितले जाते की, केवळ २५ वर्षांची असताना ल्यूडमिलाने तिच्या स्नायपर रायफलने तब्बल ३०९ लोकांचा जीव घेतला होता. यातील जास्तीत जास्त लोक हे हिटलरचे सैनिक होते. स्नायपर रायफलसोबत अविश्वसनीय क्षमतेमुळे ल्यूडमिलाला 'लेडी डेथ' नावाने ओळखले जायचे.5 / 7१२ जुलै १९१६ ला यूक्रेनच्या एका गावात जन्मलेली ल्यूडमिलाने केवळ १४ व्या वयात शस्त्र हाती घेतली होती. हेन्री साकेडा यांच्या 'हिरोइन्स ऑफ द सोव्हिएत यूनियन' पुस्तकानुसार, ल्यूडमिला ही आधी शस्त्रास्त्रांच्या फॅक्टरीमध्ये काम करत होती. पण नंतर एका पुरूषांमुळे ती स्नायपर झाली.6 / 7मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका दौऱ्यादरम्यान ल्यूडमिलाने एकदा सांगितले होते की, 'माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा शूटिंग शिकत होता आणि तेव्हाच मी ठरवलं की, मलाही शूटिंग करायचं आहे. यासाठी मी भरपूर मेहनत घेतली'. याच मेहनतीचा परिणाम म्हणजे तिने शस्त्र चालवण्यात महारात मिळवली.7 / 7नंतर १९४२ मध्ये युद्धादरम्यान ल्यूडमिला बरीच जखमी झाली होती. त्यानंतर तिला रशियाची राजधानी मॉस्कोला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तिने दुसऱ्या स्नायपर्सना ट्रेनिंग देणं सुरू केलं. तसेच नंतर रेड आर्मीची प्रवक्ता देखील झाली होती. १९४५ मध्ये युद्ध संपल्यावर तिने सोव्हिएत नौसेनेच्या मुख्यालयातही काम केलं. १० ऑक्टोबर १९७४ ला ५८व्या वर्षी मॉस्कोत तिचं निधन झालं. आणखी वाचा Subscribe to Notifications