'या' बेटावर आढळले 200 वर्षांपूर्वीचे शेकडो-हजारो मानवी सागांडे, पाहा थरारक फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 3:24 PM
1 / 5 लंडन: तुम्ही बऱ्याच विचित्र किंवा भीतीदायक ठिकाणांबद्दल ऐकलं असेल, तिथे गेलाही असाल. पण, पृथ्वीवर अशी एक जागा आहे, जिथं जाण्याचा तुम्ही विचारही करणार नाहीत. युनायटेड किंगडममध्ये असलेल्या एका बेटावर मृतदेहांचा खच साचलेला दिसतो. 2 / 5 ससेक्स लाईव्हमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, युनायटेड किंगडममधील मेडवे नदीच्या मध्यभागी हे बेट आहे. बेटावर सापडलेल्या मृतदेहाच्या ढिगाऱ्यामुळेच बेटाला 'डेडमन्स बेट' असं म्हणतात. 3 / 5 मिळालेल्या माहितीनुसार, 200 वर्षांपूर्वी मोठ-मोठ्या जहाजातील तुरुंगात प्रवास करताना मृत्यू झालेल्या किंवा समुद्रातील वादळामुळे जहाज बुडून मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह या बेटावर पुरले जायचे. 4 / 5 या बेटावर सर्वत्र मानवी सांगाडे दिसतात. तर, अनेक ठिकाणी लाकडापासून बनवलेल्या शवपेट्याही सापडल्या आहेत. अलीकडेच काही शास्त्रज्ञांना बेटावर जाण्याची परवानगी देण्यात आली. पण, सर्वसामान्यांना येथे जाण्यास बंदी आहे. 5 / 5 या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली. पण, आता जेव्हा समुद्रातील पाण्याची पातळी कमी होते. तेव्हा या बेटावरील मृतदेह जमिनीवर आलेले दिसतात. शेकडो हजारो मृतदेह या ठिकाणी पुरले गेले आहेत. आणखी वाचा