शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका एअरपोर्टखाली सापडले हजारो वर्ष जुने हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष, फोटो व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:55 AM

1 / 8
मेक्सिको शहरात हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष त्या जीवांचे आहेत जे फार पूर्वी हत्तींसारखे कळपाने रहायचे. मेक्सिको शहरात जिथे नव्या एअरपोर्टचं काम सुरू होतं तिथे हे अवशेष मिळाले आहेत. तसेच या ठिकाणी इतरही काही प्राण्यांची हाडे मिळाली आहेत.
2 / 8
मेक्सिको शहरात फेलिप एंजेल्स इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. अशाच एका खोदकामावेळी 60 मॅमथचे अवशेष मिळाले आहेत.
3 / 8
फेलिप एंजेल्स इंटरनॅशनल एअरपोर्ट मेक्सिको शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर तयार होत आहे. मेक्सिकोच्या इंन्स्टिट्यूट ऑफ एंथ्रोपोलॉजी अॅन्ड हिस्ट्रीकडून सांगण्यात आले आहे की, खोदकाम करताना मॅमथचे अवशेष मिळाले आहेत आणि हे अवशेष साधारण 15 हजार वर्ष जुने आहेत.
4 / 8
ज्या ठिकाणी हे अवशेष मिळाले आहेत त्या ठिकाणी एअरपोर्टचं कंट्रोल टॉवर तयार केलं जाणार आहे.
5 / 8
एअरपोर्टच्या निर्माणस्थळावर जाल्टोकॅन तलावाखाली दबली होती. जी मेक्सिकन बेसिनचा भाग होती. प्री-कोलंबियन संस्कृतीत हा परिसर एक नावाजलेला भाग असायचा.
6 / 8
त्या काळात याच ठिकाणी मॅमथची शिकार होत होती. पण नंतर येथील तलाव कोरडा पडला. त्यानंतर इथे मॅमथचे अवशेष सापडू लागले आणि आर्किओलॉजिस्ट खोदकाम करत आहेत.
7 / 8
इंन्स्टिट्यूट ऑफ एंथ्रोपोलॉजी अॅन्ड हिस्ट्रीचे वैज्ञानिक म्हणाले की, एअरपोर्टमधून मिळालेले मॅमथचे अवशेष जास्तकरून प्री-कोलंबियन संस्कृतीतील आहे. यातून आम्हाला मोठी माहिती मिळू शकते.
8 / 8
या एअरपोर्टच्या निर्माणस्थळातून अनेक जुन्या प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. यात बाइसन, उंट, घोडे यांचाही समावेश आहे. तसेच प्री-हिस्पॅनिक काळात दफन करण्यात आलेले मनुष्यांचे अवशेष मिळाले आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMexicoमेक्सिकोInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स