हे ७ बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत शाही घराण्याचे वारसदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 19:33 IST
1 / 7गोड चेहऱ्याची अदिती राव हैदरी हिने बॉलिवूडमध्ये जास्त चित्रपट केले नाहीयेत, मात्र तरीही तिने स्वत:ची ओळख निर्माण केलीये. राजा वानापार्थीच्या शाही कुटूंबातल्या अदितीने अभिनय क्षेत्राची निवड करून २००७ ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.2 / 71971मध्ये भारत सरकारने पद काढून घेईपर्यंत सैफ अली खानचे वडील मन्सुर अली खान पतौडी हे पतौडी खानदानाचे शेवटचे नवाब होते. मात्र तरी अजूनही सैफला नवाब हे पद चिटकूनच आहे. जीर्णोद्धार आणि पुनर्रचनेनंतर 2014 साली सैफ अली खानकडून पतौडी पॅलेसची पुनर्स्थापना करण्यात आली.3 / 7आमीर खानची पत्नी किरण रावही जे. रामेश्वरम राव यांच्या कुंटूबातून आहे. तिचे आजोबा तेलंगणातील वानापार्थीचे राजा होते. नंतर तिने आमीरशी लग्न केलं. नात्याने अदिती राद हैदरी ही तिची चुलत बहिण लागते.4 / 7अलिसा खानला तुम्ही अनेक म्युझिक व्हिडीयोमध्ये पाहिले असेल. गाझीयाबाद येथील मोहम्मद नवाब गाझिउद्दीन खान अर्थात वझीर गाझी-उद-दीन या राजघराण्यातून ती आहे. 5 / 7'मैंने प्यार किया' चित्रपटातून सलमान खानसोबत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्येश्री महाराष्ट्रातील सांगलीच्या राजघराण्यातील कन्या आहे. सांगलीचे राजा विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी आहे.6 / 7सोनल चौहान ही अभिनेत्री उत्तर प्रदेशच्या मणिपुरी येथील पारंपारिक राजपुत कुटूंबातील आहे. जन्नत चित्रपटातील या अभिनेत्रीचा जन्म आणि बालपण दिल्लीत गेलं आहे.7 / 7अभिनेत्री मुन मुन सेन यांच्या मुली रिया आणि रायमा सेन या दोघीसुध्दा एका शाही कुटूंबाशी निगडीत आहेत. आईनंतर या दोन बहिणीही परंपरेनुसार बंगाली चित्रपटाच्या अविभाज्य भाग बनल्या. त्यांची आजी इला देवी ही कुच बेहारची राजकुमारी होती तर मोठी बहिण गायत्री देवी जयपुरची महाराणी होती.