या सजिवांना निसर्गाने दिले आहे अमरत्वाचे वरदान, त्यांचा कधीही होत नाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 09:34 IST
1 / 7सृष्टीतील कुठलाही सजीव म्हटला की त्याचा मृत्यू हा ठरलेलाच असतो. मात्र या निसर्गात असेही काही सजीव आहेत ज्यांचा कधीच मृत्यू होत नाही. आज जाणून घेऊया अशाच सजिवांविषयी. या यादीतील पहिले तीन जीव हे खरोखरच अमर आहेत. 2 / 7हा प्राणी अजर अमर आहे. तुम्ही याचे दोनशे तुकडे केले तरी त्या प्रत्येक तुकड्यामधून एक नवा प्राणी जन्मास येतो. 3 / 7या प्राण्याला तुम्ही बहुमुखी साप संबोधू शकता. याचासुद्धा कधीच नैसर्गिक मृत्यू होत नाही. हा प्राणी स्वत:च्या शरीराला अनेक भागात विभाजित करून त्याचा एक नवा हायड्रा विकसित करतो. 4 / 7जेलिफिशबाबत तुम्हा सर्वांना माहिती असेलच. हासुद्धा एक अमर जीव आहे. तो स्वत:च्या पेशी बदलून पुन्हा एकता तारुण्य प्राप्त करतो. हे चक्र कायम सुरू राहते. 5 / 7पाण्यात राहणारा आठ पायांचा आणि ४ मिमी आकाराचा हा प्राणी सुमारे ३० वर्षे काहीही न खाता पिता राहू शकतो. एवढेच नाही तर अंतराळातील पोकळीतही जिवंत राहण्याची क्षमता या प्राण्यामध्ये आहे. हा जीव पृथ्वीवर पर्वतापासून सागरापर्यंत सगळीकडे आढळतो. मात्र त्याला पृथ्वीवरील जीव मानले जात नाही. 6 / 7अलास्कन वूड फ्रॉग हा जीवसुद्धा अमर असल्याचे मानले जाते. अलास्कामध्ये जेव्हा तापमान -२० अंशांच्या खाली जाते तेव्हा याचे शरीर जवळपास गोठून जाते. त्याचे श्वसन आणि हृदयाचे ठोकेसुद्धा बंद होतात. वैद्यकीय भाषेत त्याचा मृत्यू झालेला असतो. मात्र वसंत ऋतूची सुरुवात झाल्यावर त्याच्या हृदयात इलेक्ट्रिक चार्ज उत्पन्न होतो. तसेच त्याचे हृदय पुन्हा सुरू होऊन जिवंत होतो. त्यामुळेच त्याला फ्रोझन फ्रॉग असेही म्हणतात. 7 / 7हा मासा सुमारे पाच वर्षे काही खाता पिता राहू शकतो. आफ्रिकेत आढळणारा हा मासा दुष्काळ पडल्यावर स्वत:ला जमिनीत गाडून घेतो.