These are the 13 smallest creatures in the world!
हे आहेत जगातील सर्वात छोटे 13 प्राणी, फोटो पाहून थक्क व्हाल ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:56 PM1 / 12पिग्मी रॅबिट- या सश्याची लांबी 9.25 इंचांपासून 11.6 इंचांपर्यंत असते. 2 / 12द्वार्फ लँटर्न शार्क: या शार्कची लांबी 8.3 इंच एवढी असते. 3 / 12पिग्मी मार्मोसेट: हा जगातला सर्वात छोटा माकड आहे. त्याची लांबी अंदाजे 4.6 इंच ते 6.2 इंचांएवढी असते4 / 12बारबाडोस थ्रेड स्नेकः या सापाची लांबी जवळपास 4.1 इंच एवढी आहे. हा जगभरातला सर्वात छोटा साप आहे. 5 / 12माऊस लेमूर- मेडागास्करच्या आयलँडमध्ये आढळणाऱ्या उंदराची लांबी 3.6 इंच असते. 6 / 12विलियम द्वार्फ गेक्को: हा केवळ 3 इंच(7.6 सेंटीमीटर)लांबीचा असतो. तंजानियामध्ये ही जात आढळते. 7 / 12बी हुममिंगबर्डः जगातला हा सर्वात छोटा पक्षी आहे, मधुमख्खी हॅमिंगबर्ड, मेलिसुगा हेलेना हा पक्षी 2.2(5.6 सेटींमीटर) लांबीचा असतो.8 / 12स्पेकलेड पडलो पैर टॉर्टोइस: पृथ्वीवर हा सर्वात छोट्या प्रजातीचा कासव आहे. हा कासव 2.4-3.1 इंच (6.1-7.9 सेंटीमीटर) एवढा लांब असतो. 9 / 12बलुचिस्तान पिग्मी जरबोआ: बलुचिस्तान पिग्मी जरबोआच्या शरीराची लांबी 1.7 इंच(4.3 सेंटीमीटर) आहे. जो जगात सर्वात छोटा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हा प्राणी आढळून येतो. कांगारुंच्या प्रजातीत या प्राण्याची गणना केली जाते. 10 / 12इट्रस्केन श्रेवः याच्या शेपटीची लांबी 1.5 (11.4 सेंटीमीटर) इंच एवढीच असते, भूमध्य क्षेत्रापासून दक्षिणपूर्वी आशियापर्यंतच्या भूमीवर तो आढळतो. 11 / 12ब्रोकेसिया मायक्राः ब्रोकेसिया मायक्रा केवळ 1 इंच (2.5 सेंटीमीटर) लांब आहे. हा एका बोटाच्या बसेल एवढाच आहे. मेडागास्कर या आयलंडवर तो सापडतो. 12 / 12व्हर्जिन आयलँड द्वार्फ सफारी: हा केवळ 0.6 इंच(1.5 सेंटीमीटर) लांब आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications