ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 21 - प्रत्येक शहराची, गावाची किंवा पाड्याची एक खासियत असते. ती म्हणजे त्या ठिकाणी लाभलेलं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित उभारलेलं सौंदर्य. अशाच शहरांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक उत्साहीत असतात. अशा पर्यटकांसाठी आम्ही घेऊन आलोय जगातील काही शहरांमधील रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या गल्ल्या. या गल्ल्यातून किंवा शहरांच्या रस्त्यांवरून फेरफटका मारताना नक्कीच येथील सौंदर्य पुन्हा-पुन्हा आकर्षित करण्यासारखं आहे. स्पेलोइटली - अम्ब्रिया येथील स्पेलो गल्लीतील घरांच्या खिडकी, बाल्कनी आणि रस्त्यांवर सुंदर फुलांनी बहरलेल्या दिसतील. या रंगीबेरंगी फुलांमुळे या शहराची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. लोमबार्ड स्ट्रीटअमेरिका - सॅन फ्रान्सिस्को येथील लोमबार्ड स्ट्रीटवर व्हिक्टोरियन स्टाईलची घरे बनविण्यात आली आहेत. याठिकाणी वसंत ऋतूमध्ये जणू फुलांची बरसातच होते. तसेच या ठिकाणी फेरफटका मारताना फुलांचा दरवळलेला सुगंध अनुभवता येईल. रुआ गोन्जकले द कार्वाव्होब्राझील - अत्याधुनिक सुविधा असलेले शहर म्हणून ब्राझीलकडे पाहण्यात येत आहे. येथील पोर्टो एलेग्रेमधील रुआ गोन्जकले द कार्वाव्हो रोडवर अनेक झाडे लावली आहे. त्यामुळे 500 मीटरचा रोड झाडांनी व्यापला असल्यामुळे या ठिकाणी वसंत ऋतूमध्ये रोडवर फुलांचा सडा पडलेला असतो. पाउंड स्ट्रीटऑस्ट्रेलिया - ग्राफ्टनमधील जॅकरांडा एव्हेन्यू अशा नावाने ओळखला जाणारा रोड फिकट जांभळ्या रंगाच्या फुलांनी सजलेला असतो. देशी-विदेशी पर्यटकांच्या आवडीचा हा रोड समजला जातो.