शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बालपण देगा देवा; तुम्हालाही वाटतो का लहानपणीच्या 'या' गोष्टींचा हेवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:53 PM

1 / 10
लहानपणीच्या अनेक आठवणी अनेकांच्या मनात आजही ताजा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लंगडीचा हा खेळ. यावरुन अनेकदा भांडणंही व्हायची.
2 / 10
अनेकांना च्युईंगम खाणं आवडतं. अनेकांना लहानपणी ही सवय लागली. स्टीकर फ्री मिळतं म्हणून अनेकजण त्यावेळी च्युईंगम खरेदी करायचे.
3 / 10
शक्तीमान ही त्यावेळची अतिशय लोकप्रिय मालिका होती. ही मालिका लागली की सर्वजण हातातलं काम टाकून टीव्हीसमोर बसायचे.
4 / 10
सापशिडीचा खेळ तर अनेकांना आजही आठवतो. आता मोबाईलमध्येही सापशिडी खेळता येते. मात्र त्यात ती गंमत नाही.
5 / 10
आता कितीही महागड्या गोळ्या खा. पण त्याची तुलना या गोळ्यांशी होऊ शकत नाही. कारण या गोळ्यांशी लहानपणीच्या अनेक गोड आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
6 / 10
पेन पेन्सिलसाठी आई बाबांकडे हट्ट केला नाही, अशी व्यक्ती सापडणं अवघडच.
7 / 10
जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असणाऱ्यांकडे हा खजिना सापडायचा.
8 / 10
दिवाळी आली की अनेकांकडे असे रोल असायचे. काहीजण तर भिंतीवर फासून हा रोल फोडायचे.
9 / 10
आता मोबाईलवर अगदी कोणतीही गाणी लावता येतात. मात्र वॉकमॅनची बातच काही और होती.
10 / 10
इंक पेनानं अक्षर सुंदर येतं असं म्हटलं जायचं. त्यामुळे अनेकांनी हे पेन घेतलं. मात्र हे पेन झटकलं की शाई उडायची अन् शाळेत विद्यार्थ्यांचे कपडे खराब व्हायचे.