शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटीश राजघराण्यातील लोक चुकूनही 'या' 7 शब्दांचा करत नाहीत वापर, वाचा टॉयलेटला ते काय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 11:44 AM

1 / 9
जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशात ब्रिटनच्या राज घराण्याती प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अशात पुन्हा एकदा या घराण्याबाबतच्या काही आश्चर्यकारक गोष्टींची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियात त्यांच्याविषयीची माहिती शेअर होत आहे.
2 / 9
अशात आम्हीही ब्रिटनच्या राजघराण्याबाबतची एक खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राजघराण्यातील लोकांच्या खाण्या-पिण्याबाबत, उठण्या-बसण्याबाबत, बोलण्याबाबत काही पद्धत असते. सोशल ऐंथ्रोपॉलजिस्ट केट फॉक्स यांच्यानुसार, इंग्रजीतील असे काही शब्द आहेत ज्यांचा वापर राजघराण्यातील लोक कधीच करत नाहीत.
3 / 9
Mom-Dad - आपल्या आई-वडिलांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने आवाज देतो. परदेशातही मॉम-डॅड हे प्रचलित आहे. पण राजघराण्यातील लोक हे त्यांच्या आई-वडिलांना मॉम किंवा डॅड असं म्हणत नाहीत. ते थेट मम्मी आणि डॅडी असंच म्हणतात.
4 / 9
Toilet - ब्रिटीश राजघराण्यातील लोक टॉयलेट या शब्दाचा वापर करत नाहीत. कारण ते शब्दाला लोक क्लास मानतात. त्याऐवजी ते लू(Loo) किंवा लावेटरी(Lavatory) शब्दाचा वापर करतात.
5 / 9
Pardon - काही चूक झाली असेल तर Pardon हा शब्द वापरणं साधारणपणे मॅनर्स मानलं जातं. पण हा शब्द तुम्ही राजघराण्यातील लोकांसमोर वापरू शकत नाही. हा शब्द खराब मानला जातो. ते लोक Pardon ऐवजी Sorry शब्द वापरतात.
6 / 9
Perfume - ब्रिटीश राजघराण्यातील लोक परफ्यूम या शब्दाचा देखील वापर करत नाहीत. ते सेंट या शब्दाचा वापर करतात.
7 / 9
Tea - यूनायटेड किंगडमच्या अनेक भागांमध्ये टी केवळ एक ड्रिंकच नाही तर सायंकाळी 5 ते 7 वाजतादरम्यान खाल्ल्या जाणाऱ्या खाण्यालाही टी म्हटलं जातं. पण हायक्लासमध्ये हा शब्द वापरला जात नाही. अप्पर क्लास याला डिनर म्हणतात.
8 / 9
Portion - एखाद्या खाण्याच्या पदार्थाच्या एका भागाला सामान्यपणे पोर्शन म्हटलं जातं. पण ब्रिटीश राजघराण्यात याला हेल्पिंग साइज असं म्हटलं जातं.
9 / 9
Lounge - तसा तर लाउंज हा फारच सामान्य शब्द आहे. पण ब्रिटीश राजघराण्यातील लोक त्यांच्या फ्रन्ट रूमला लाउंज नाही तर ड्राइंग रूम किंवा सिटींग रूम म्हणतात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स