शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 5:16 PM

1 / 6
भारत हे विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे. आपल्या देशात प्रत्येक राज्यात किंवा विभागात वेगळी भाषा ऐकायला मिळते. मात्र, आपल्या देशात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? त्याबद्दल जाणून घ्या...
2 / 6
दरम्यान, हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आणि तिला भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा आहे. ती देशाच्या बहुतांश भागात समजली जाते आणि ती भारताची राष्ट्रीय भाषा देखील मानली जाते.
3 / 6
याशिवाय, भारतात व्यवसाय, शिक्षण आणि प्रशासनाची भाषा म्हणून इंग्रजीचा वापर केला जातो. ब्रिटीश राजवटीमुळे भारतात इंग्रजी खूप प्रचलित आहे.
4 / 6
याचबरोबर, भारतात तमिळ ही द्रविड भाषा कुटुंबातील एक भाषा आहे आणि ती दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात सर्वाधिक बोलली जाते. तमिळ भाषा इथे सामान्य भाषा मानली जाते.
5 / 6
तसेच, तेलुगू ही द्रविडी भाषा कुटुंबातील एक भाषा आहे आणि ती दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये सर्वाधिक बोलली जाते.
6 / 6
याशिवाय मराठी, बंगाली, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम याही भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. मात्र, या व्यतिरिक्त, इतर भाषा देखील भारतात बोलल्या जातात.
टॅग्स :IndiaभारतJara hatkeजरा हटके