these tips will reduce the huge electricity bill
'या' टिप्स वापरून करा विजेची बचत By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 5:02 PM1 / 8विजेची बचत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा घाई-गडबडीत टीव्ही, फॅन, लाईट्स बंद करायला लोक विसरतात. त्यामुळे वीज बिल जास्त येतं. 'या' टिप्स वापरून विजेची बचत करा. 2 / 8घरामध्ये नॉर्मल बल्बच्या जागी लो एनर्जी बल्ब अथवा सीएफएल लाईट्स लावा. यामुळे विजेची बचत होईल. 3 / 8टीव्ही, लॅपटॉप, संगणक, मिक्सरसारख्या इतर उपकरणांचा वापर करून झाल्यानंतर आठवणीने ते बंद करा. 4 / 8गरम होत असल्याने एसी आणि कूलरचा वापर केला जातो. मात्र आवश्यकता नसल्यास ते बंद करा. खिडक्या उघडा म्हणजे बाहेरची मोकळी हवा आतमध्ये येईल. 5 / 8लँपचा वापर घरामध्ये केला जातो. मात्र याचा रोज वापर न कराता काही खास कार्यक्रमांसाठी वापर करा. 6 / 8संगणक, लॅपटॉपवर काम करताना थोडा ब्रेक घ्या आणि काही वेळ मॉनिटर बंद करा.7 / 8घरामध्ये ऑटोमॅटीक मशीनचा वापर करा. ज्यामध्या सेट असेल. त्यामुळे आपोआप गरज नसताना उपकरणं बंद होतील. 8 / 8फोन, लॅपटॉप चार्ज केल्यानंतर स्विच बोर्ड न विसरता बंद करा. आणखी वाचा Subscribe to Notifications