These women in Pakistan have freedom to choose life partner api
बाबो! 'इथे' दुसरा पुरूष आवडला तर लग्न मोडून त्याच्यासोबत राहतात महिला... By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:56 PM1 / 10पाकिस्तानातील अफगाणिस्तान बॉर्डरजवळ राहणारी कलाशा जमात पाकिस्तानातील सर्वात कमी संख्या असलेला समाज म्हणून गणली जाते. या समाजातील लोकांच्या संख्या जवळपास पावणे चार हजार इतकीच आहे. हा समाज आपल्या काही विचित्र आणि काही आधुनिक परंपरांसाठी ओळखला जातो. जसे की, या समाजातील महिलांना जर पर पुरूष पसंत पडला तर त्या त्यांचं लग्न मोडू शकतात. चला जाणून घेऊ या समाजाच्या अशाच काही खास गोष्टी....2 / 10कलाशा समाजातील लोक खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल परिसराच्या बाम्बुराते, बिरीर आणि रामबूर इथे राहतात. हा समाज हिंदू कुश डोंगरांनी वेढलेला आहे आणि यामुळे त्यांची संस्कृती टिकून असल्याचे त्यांचे मत आहे. 3 / 10या डोंगराचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. जसे की, या परिसरात सिकंदराच्या विजयानंतर याला कौकासोश इन्दिकौश म्हटलं जाऊ लागलं. यूनानी भाषेत याचा अर्थ आहे हिंदुस्तानी पर्वत. या लोकांना सिकंदराचे वंशजही मानलं जातं.4 / 10२०१८ मध्ये पहिल्यांदा कलाशा लोकांची जगगणना केली गेली आणि त्यांचा विशेष जातीचा दर्जा देण्यात आला. या गणनेनुसार या समाजात एकूण ३ हजार ८०० लोक आहेत. येथील लोक माती, लाकडं आणि चिखलापासून तयार छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात. कोणताही उत्सव असेल तर महिला आणि पुरूष एकत्र मद्यसेवन करतात.5 / 10कलाशा जमातीतील घरांमधील कामे जास्तीत जास्त महिलाच सांभाळतात. त्या बकऱ्यांना चारण्यासाठी डोंगरांमध्ये घेऊन जातात. घरीच वेगवेगळ्या वस्तू तयार करतात. या वस्तू पुरूष विकतात. येथील महिलांना श्रृंगार करणं फार आवडतं. डोक्यावर खासप्रकारची टोपी आणि गळ्यात दगडांची रंगीत माळ घालतात.6 / 10इथे वर्षभरात तीन उत्सव होतात. Camos, Joshi आणि Uchaw. यातील Camos हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. यात महिला-पुरूष आणि तरूण-तरूणी एकमेकांना भेटतात. यादरम्यानच अनेक नाती जोडली जातात. या समाजात नात्यांबाबत फारच खुले विचार आहेत. जसे की, महिलांना जर दुसरा पुरूष आवडला तर त्या त्याच्यासोबत राहू शकतात.7 / 10पाकिस्तानसारख्या देशात महिला स्वातंत्र्यबाबत बोलल्या तर फतवे निघतात. अशात दुसरीकडे या समाजातील महिलांना त्यांचा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्या पती निवडतात, सोबत राहतात. पण जर लग्नानंतर जोडीदाराकडून खूश नसतील तर त्या कोणत्याही अडचणीशिवाय दुसरा पुरूष निवडू शकतात.8 / 10असे काही आधुनिक विचार असले तर या महिलांवर काही बंधनेही आहेत. जसे की, मासिक पाळीदरम्यान त्या घराबाहेर निघू शकत नाहीत. यादरम्यान त्यांना अपवित्र मानलं जातं. त्यांना स्पर्श केला जात नाही.9 / 10या समाजातील काही रिवाजही विचित्र आहेत. जसे की, कुणाचं निधन झालं तर त्यांच्यासाठी हा क्षण आनंदाचा नाही तर दु:खाचा क्षण असतो. अत्यंयात्रेवेळी हे लोक आनंद साजरा करतात. नाचतात-गातात आणि मद्यसेवन करतात. ते मानतात की, ते देवाच्या मर्जीने इथे आले आणि देवाच्या मर्जीनेच वर जातात.10 / 10सध्या पाकिस्तान आणि अफगाण सीमेवर तणाव वाढल्याने या समाजावर सर्वात जास्त प्रभाव बघायला मिळतोय. आता पर्यटक कमी येतात, त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे ते बिकट परिस्थितीत जगत आहेत. तर त्यांची नवीन पिढी परदेशात जाण्यासही तयार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications