शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनच्या या दुसऱ्या भिंतीबाबत अर्ध्या जगाला नाही माहिती, दडले आहेत अनेक रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 2:02 PM

1 / 9
जगातील इतर देशांप्रमाणे चीनचाही आपला एक वेगळा आणि रहस्यमय इतिहास आहे. येथील प्राचीन इमारती आणि भवन चीनच्या इतिहासाची पाने उलगडतात. आपल्या हेरिटेज स्थळांमुळे चीन पर्यटनातही पुढे आहे. इथे असलेली 'Great Wall of China' ला जगातली सर्वात लांब भिंत मानली जाते.
2 / 9
ही एक ऐतिहासिक भींत आहे जी प्राचीन काळात तयार करण्यात आली होती. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये आणखी एक प्राचीन भींत आहे. या भिंतीबाबत जास्त लोकांना माहीत नाही. चला आज आम्ही तुम्हाला या चीनमधील दुसऱ्या ऐतिहासिक भिंतीबाबत सांगतो.
3 / 9
सिटी वॉल ऑफ नानजिंग (City Wall of Nanjing) - ही ऐतिहासिक भींत आहे चीनच्या नानजिंग शहरात. ही भींत साधारण ६०० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं. या भींतीने एका शहराला वेढा दिला आहे. मात्र शहराच्या विकासासाठी अनेक ठिकाणाहून या भिंतीचे काही भाग तोडले. ही भींत मिंग राजवंशाकडून(१३६८-१६४४) बांधण्यात आली होती.
4 / 9
३५ किमीपेक्षा जास्त लांब - चीनची ही दुसरी प्राचीन भींत ३५ किलोमीटरपेक्षाही लांब आहे. तज्ज्ञ सांगतात की, या भिंतीकडे ५० ते ६० च्या दशकात पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. ही भींत १४ ते २१ मीटर उंच आहे. तेच ही भींत बांधायला २१ वर्षे लागली होती. तर २ लाखांपेक्षा जास्त मजूर यासाठी काम करत होते.
5 / 9
३५ कोटींपेक्षा जास्त वीटा - तज्ज्ञ सांगतात की, ही प्राचीन भींत बांधण्यासाठी ३५ कोटींपेक्षाहीही जास्त विटांचा वापर केला होता. भिंतीतील अनेक विटांवर त्या तयार करणाऱ्यांची नावेही आहेत. सुरूवातील या भिंतीच्या १३ दरवाज्यांचं निर्माण करण्यात आलं होतं. मात्र, मिंग राजवंशाचा अंत होता होता ५ आणखी दरवाजांचं निर्माण करण्यात आलं.
6 / 9
जेव्हा जपानने चीनवर हल्ला केला होता तेव्हा ही भींत पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, जपानी सेना ही प्राचीन आणि विशाल भींत पाडू शकली नव्हती.
7 / 9
शहराच्या विकासासाठी वेळोवेळी या भिंतीचे अनेक भाग तोडण्यात आले होते. यातून निघालेल्या विटांचा वापर रस्ते निर्माण आणि इमारती बांधण्यासाठी करण्यात आला. ही भींत शहरात आहे त्यामुळे भाजी विक्रेतेही या भिंतीजवळ बसून भाजी विकतात. भिंतीतील विटांचा वापर टेबल आणि चेअरसारखा केला जातो.
8 / 9
आधी सांगितल्याप्रमाणे या भिंतीतून काढलेल्या विटांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला. सोबतच अनेकांनी येथील वीटा चोरीही केल्या होत्या. ही भींत वाचवण्यासाठी एक अभियानही सुरू करण्यात आलं होतं. जेणेकरून लोक वीटा परत करतील. असं मानलं जातं की, या अभियाना अंतर्गत ८० हजार वीटा परत मिळाल्या आहेत.
9 / 9
सध्या या भिंतीच्या डागडुजीचं काम केलं जात आहे. अनेक भागावर लोकांना बसण्यासाठी जागाही बनवली आहे. ही भींत वाचवण्यासाठी अनेक लोक समोर आले आहेत. त्यांचं मत आहे की, आम्हाला केवळ ही भिंतच नाही तर संस्कृती वाचवायची आहे.
टॅग्स :chinaचीनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके