शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोजचे असे काही पदार्थ किंवा वस्तू ज्यांना तुम्ही मेड इन इंडिया म्हणता, ते मुळात भारतीय नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 2:51 PM

1 / 9
लोक रोज वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करत असतात. लोक रोज वेगवेगळे पदार्थ खातात. या गोष्टींवर अभिमानाने मेड इन इंडिया अशा ठप्पाही लावतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, मेड इन इंडिया समजल्या जाणाऱ्या या गोष्टी मुळात भारतातील नाहीच. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांबाबत वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.
2 / 9
सकाळचा नाश्ता म्हटलं की, भरपूर लोक आवडीने देशभरात समोसा चटणी खातात. समोसा हा देशभरात सगळ्यात आवडला जाणारा पदार्थ आहे आणि देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मिळतो. मात्र, समोसा हा पदार्थ मुळात मध्य आशियातील आहे. मुघल भारतात आले तेव्हा ते समोसा भारतात घेऊन आले होते.
3 / 9
रोज लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी आवडीने खातात. पण हा पदार्थ भारतातील नाही. बिर्याणी मुघल लोक भारतात घेऊन आले. खासकरुन तुर्की लोक.
4 / 9
राजम्याची करी किंवा राजम्याचे आणखीही काही पदार्थ तुम्ही किती आवडीने खाल्ले असतील. पण तुम्हाला हे माहीत नाही की, राजमा भारतीय नाही. राजमा हे मेक्सिकन कडधान्य आहे. मेक्सिकोतून ते भारतात आलं.
5 / 9
ब्रिटीश लोक भारत सोडून जाताना अनेक गोष्टी भारताला देऊन गेले. त्या काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी आहेत. त्यातील एक चांगली गोष्ट म्हणजे चहा. चहा इंग्रजांनी भारतात आणला. महत्वाची बाब म्हणजे 1950 पर्यंत भारतात चहा जास्त लोकप्रियही नव्हता.
6 / 9
ही खरंतर अनेकांना धक्कादायक बाब वाटू शकते. पण हे खरंय. देशातील सर्वात लोकप्रिय असलेला ब्रॅन्ड हा भारतीय नाही आहे. बाटा हा झेकल्सोव्हाकीयाचा ब्रॅन्ड आहे. झेच फॅमिलीने हा ब्रॅऩ्ड 1894 मध्ये सुरु केला होता. या कंपनीचे जगभरातील 60 देशांमध्ये शोरुम आहेत.
7 / 9
जिलेबी हा पदार्थही भारतीय नाहीये. हा पदार्थ पारसी लोकांनी भारतात आणला. जिलेबीला पारसी भाषेत झलिबिया आणि अरेबिक भाषेत झलबिया असं म्हटलं जातं.
8 / 9
रोजच्या जेवणातील या भाज्या आपण किती आवडीने खातो. पण या भाज्या भारतीय नाहीये असे सांगितल्यावर तुम्हाला काय वाटेल. तुम्ही म्हणाल ही काय फालतूगिरी आहे. पण हे खरंय की, या दोन्ही भाज्या भारतीय नाहीत. टोमॅंटो आपल्याला साऊथ आफ्रिकेकडून मिळाला आणि बटाटा पेरुकडून मिळाला आहे.
9 / 9
देशातील सर्वात जास्त विकलं जाणारं टूथपेस्ट कोलगेट हे आहे. टूथपेस्ट म्हटलं की, केवळ कोलगेट हे नाव सर्वात पहिले घेतलं जातं. पण हे सुध्दा भारतीय नाहीये. कोलगेट ही एक अमेरिकन कंपनी आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके