शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२४ तासात केवळ ३० मिनिटांची झोप घेते 'ही' व्यक्ती, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 4:32 PM

1 / 9
Japan Short Sleeper Daisuke Hori: सामान्यपणे निरोगी जीवन जगण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्तीला किमान ७ ते ८ तास झोप घेण्याची गरज असते. पण रोज केवळ ३० मिनिटे झोपून कुणी जिवंत राहणं या गोष्टीवर सहज विश्वास बसत नाही. मात्र, जपानमध्ये एक अशी व्यक्ती आहे.
2 / 9
जपानमधील दायसुके होरी ही व्यक्ती गेल्या १२ वर्षांपासून हेच करत आहे. ४० वर्षीय या उद्योगपतीने मेंदू आणि शरीराला तसं ट्रेन केलं आहे.
3 / 9
दाइसुके होरी यांच्या या कहाणीने जपानच नाही तर जगभरातील लोकांचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित झालं आहे. होरी यांचा दावा आहे की, आपली झोप कमी करून त्यानी कार्यक्षमता सुधारली आणि जीवनाचा अधिक आनंद घेतला.
4 / 9
त्यांच्यानुसार, चांगल्या क्वालिटीची झोप जास्त वेळ झोपण्यापेक्षा अधिक महत्वाची आहे. खासकरून अशा लोकांसाठी ज्यांच्या कामात निरंतर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते.
5 / 9
होरीने साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितलं की, 'ज्या लोकांना त्यांच्या कामामध्ये नेहमीत लक्ष केंद्रित करण्याची गरज असते, त्यांनी जास्त झोप घेण्यापेक्षा चांगल्या गुणवत्तेची झोप घेतल्यास फायदा मिळेल'.
6 / 9
होरीचे दावे खरे आहेत की खोटो हे जाणून घेण्यासाठी जपानच्या योमिउरी टीव्हीने एक रिअॅलिटी शो 'विल यू गो विद मी?' मध्ये त्यांच्या लाइफस्टाईलवर बारकाईने लक्ष ठेवलं. तीन दिवस होरी यांच्या दिनचर्येवर नजर ठेवली गेली.
7 / 9
ज्यातून खुलासा झाला की, एकदा त्यांनी केवळ २६ मिनिटे झोप घेतली आणि पूर्ण ऊर्जेवर झोपेतून उठले. नंतर त्यांनी नाश्ता केला, कामावर गेले, इतकंच नाही तर जिममध्येही गेले. हे सगळं त्यांनी अर्ध्या तासांच्या झोपेवर केलं.
8 / 9
२०१६ मध्ये होरीने जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनची स्थापना केली. जिथे त्यांनी दुसऱ्यांना अल्ट्रा-शॉर्ट स्लीप शेड्यूलच्या अनुकूल होण्याची पद्धत शिकवली. आजपर्यंत त्यानी २,१०० पेक्षा अधिक लोकांनी प्रशिक्षण दिलं. ज्यामुळे लोकांना आपल्या झोपेचा वेळ कमी करण्यास मदत मिळाली आणि अधिक चांगलं जीवन जगण्यास मदत मिळाली.
9 / 9
पण केवळ होरीच झोपेच्या मापदंडांना आव्हान देणारे व्यक्ती नाहीत. एका दुसऱ्या घटनेत व्हिएतनाममधील ८० वर्षीय व्यक्तीने दावा केला होता की, त्यांना ६० वर्षापेक्षा जास्त काळ झोपच आली नाही. याचं कारण त्यानी १९६२ मध्ये ताप हे सांगितलं होतं. ज्यामुळे त्याना अनेक उपाय करून आणि गोळ्या घेऊनही झोप आली नव्हती.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके