Thorn razard samaj people pandava jungle story thirsty jungle
स्वत:ला पांडवांचे वंशज मानतात हे लोक; काटेरी फांद्यांवर झोपून देतात परीक्षा, कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 11:59 AM1 / 8मध्य प्रदेशातील बैतूलच्या एका गावात आस्थेच्या नावावर एक विचित्र खेळ सुरू आहे. स्वत:ला पांडवांचे वंशज म्हणणारे रज्जड समाजाचे लोक आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आणि देवीला खूश करण्यासाठी सहजपणे काट्यांच्या फांद्यांवर लेटतात. (All Image Credit : Aajtak)2 / 8बैतूल जिल्ह्यातील सेहरा गावात दरवर्षी या महिन्यात रज्जड समाजातील लोक ही परंपरा निभावतात. या लोकांचं मत आहे की, ते पांडवांचे वंशज आहेत. पांडवांनी अशाप्रकारेच काट्यांवर झोपून सत्याची परिक्षा दिली होती. त्यामुळे रज्जड समाज ही परंपरा वर्षानुवर्षे निभावतात.3 / 8काट्यांवर झोपून हे लोक त्यांच्या आस्थेची, सत्याची आणि भक्तीची परिक्षा देतात. असं केल्याने देव खूश होतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो.4 / 8रज्जड समाजातील लोक पूजेनंतर काटेरी फांद्यांवर झोपतात. नंतर या फांद्यांची पूजा करतात. यानंतर एकापाठी एक लोक उघड्या अंगाने या काटेरी फांद्यांवर झोपून सत्य आणि भक्तीचं परिचय देतात.5 / 8या मान्यतेमागे एक आख्यायिका आहे की, एकदा पांडव पाण्यासाठी भटकत होते. बऱ्याच वेळानंतर त्यांना एका नाहल समुदायाचा एक व्यक्ती दिसला. पांडवांनी नाहलला विचारलं की, या जंगलात पाणी कुठे मिळेल. पण नाहल पांडवांना पाण्याचा पत्ता सांगण्याआधी एक अट ठेवतो. नाहल म्हणतो की, पाण्याचा स्त्रोत सांगितल्यावर त्यांना आपल्या बहिणीचा विवाह नाहलासोबत करून द्यावा लागेल.6 / 8पांडवांना बहीण नव्हती. यावर पांडवांनी एका भोंदई नावाच्या मुलीला बहीण बनवलं आणि पूर्ण रितीरिवाजासोबत तिचं नाहलाशी लग्न करून दिलं. नवरी सार करताना नाहलने पांडवांना काट्यांवर झोपून आपल्या सत्याची परिक्षा देण्यास सांगितलं. यानंतर एकापाठी एक पांडव काट्यांवर झोपले. आणि नंतर आनंदाने बहिणीला सार केलं.7 / 8त्यामुळे रज्जड समाजातील लोक स्वत:ला पांडवाने वंशज मानतात आणि काट्यांवर लेटून परिक्षा देतात. ही परंपार पन्नास पिढ्यांपासून चालत आली आहे. यावेळी या समाजातील लोकांमध्ये फार आनंद असतो. असं करून ते त्यांची बहीण सासरी सार करण्याचा आनंद मनवतात. हा कार्यक्रम पाच दिवस चालतो. 8 / 8त्यामुळे रज्जड समाजातील लोक स्वत:ला पांडवाने वंशज मानतात आणि काट्यांवर लेटून परिक्षा देतात. ही परंपार पन्नास पिढ्यांपासून चालत आली आहे. यावेळी या समाजातील लोकांमध्ये फार आनंद असतो. असं करून ते त्यांची बहीण सासरी सार करण्याचा आनंद मनवतात. हा कार्यक्रम पाच दिवस चालतो. आणखी वाचा Subscribe to Notifications