In those two photos, the scientists saw something that was directly related to the aliens ...
'त्या' दोन फोटोंमध्ये शास्त्रज्ञांना दिसले असे काही की संबंध जोडला जातोय थेट एलियन्सशी... By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 4:24 PM1 / 10आंतराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञांनी ताऱ्यांचा अशा समुहाचा शोध लावला आहे जो काही काळ अवकाशात दिसत होता पण त्याच्या अर्ध्यातासानंतर गायब झाला.2 / 10या खगोल शास्त्रज्ञांच्या टीममध्ये भारत, स्पेन, स्वीडन, अमेरिका आणि युरोपच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.3 / 10यामध्ये रात्री ग्लास प्लेटचा उपयोग करून काढण्यात आलेल्या दोन फोटोंचा समावेश आहे. ज्यापैकी एक फोटो पहिला फोटो घेतल्यानंतर काढला आहे.4 / 10हे फोटो १२ एप्रिल १९५०मध्ये काढण्यात आलेले होते. जे केलिफॉर्नियातील पालोमर ऑब्जर्वेटरीमध्ये एक्सपोज केले होते.5 / 10त्या संशोधनात असे आढळले की गायब झालेला ताऱ्यांचा समुह आजतगायत सापडलेला नाही. शास्त्रज्ञ या घटनेचा संबंध एलियन्सशी लावत आहेत.6 / 10शास्त्रज्ञांच्या मते, खगोलशास्त्राच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदा झाली आहे. खगोलशास्त्रज्ञांनी यापुर्वी ग्रॅव्हिटेश्नल लेसिंग, फास्ट रेडियो बर्स्ट अशापद्धतीचे तारे पाहिलेले नाहीत.7 / 10 नैनीतालच्या आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ ऑबर्झवेशनल सायन्सेसच्या अलोक सी. गुप्ता यांचाही या संशोधनामध्ये सहभाग होता.8 / 10हा रिपोर्ट नेचर साईंटिफिक रिपोर्टमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.9 / 10वैज्ञानिक आता या गायब झालेल्या ताऱ्यांमागच्या कारणांचा शोध घेत आहेत. वैज्ञानिकांना प्रश्न पडला आहे की हे तारे त्या ठिकाणी नेमके का होते?10 / 10याबाबतीत असेही म्हटले जात आहे की, फोटोग्राफिक प्लेट्स, रेडियोअॅक्टीव्ह पार्टीकल्सनी हे फोटो दुषित झालेले असू शकतात. त्यामुळे कदाचित ताऱ्यांचा भ्रम निर्माण झाला असावा. आणखी वाचा Subscribe to Notifications