Tigers catches bird hen in harbin siberian tiger park china photo goes viral
थरारक असं काही! एका कोंबडीमागे लागले तब्बल २० वाघ, फोटोत बघा कुणी मारली बाजी... By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 2:06 PM1 / 10अनेक प्राण्यांचे शिकारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. जेव्हा अनेक शिकारी एकत्र हल्ला करतात तेव्हा त्यांच्यापासून बचाव करणं कठिण असतं. असाच काहीसा नजारा चीनच्या एका टायगर पार्कमधून समोर आला आहे. या पार्कमध्ये साधारण १ हजार वाघ राहतात. या वाघांची एक कोंबडी पकडण्याची धडपड खरंच बघण्यासारखी होती. हा नजारा फोटोंच्या माध्यमातून बघुया. (All Image Credit : Aajtak)2 / 10ही घटना आहे २९ जुलैची. चीनच्या हार्बिन येथील सायबेरियन टायगर पार्कच्या हेंगदाझी फेलाइन ब्रीडिंग सेंटरमधील वाघांमधे कुणीतरी एक कोंबडी सोडली. आणि सुरू झाला तिला पकडण्याचा थरार....3 / 10एक कोंबडी पकडण्यासाठी वाघांनी चांगलीच धडपड केली. कोंबडीच्या मागे लागलेले असताना ते एकमेकांवर पडले. पण कोंबडीने वाघांना चांललंच हैराण केलं.4 / 10वाघ कोंबडीला पकडत असताना अनेकदा एकमेकांशी भिडले देखील. पण यश तर त्यालाच मिळतं ना ज्याच्याकडे ताकद आणि अनुभव आहे.5 / 10बऱ्याच मेहनतीनंतर एका अनुभवी वाघाने कोंबडीला धरलं. ही कोंबडी त्याचा नाश्ता ठरली. 6 / 10हार्बिनचा हा टायगर पार्क चीनमधील सर्वात मोठा सायबेरियन टायगर पार्क आहे. इथे २५० एकर परिसरात हा पार्क पसरलेला आहे.7 / 10यात साधारण १ हजारांपेक्षा अधिक वाघ आहे. तसेच सिंह आणि प्यूमाही बघायला मिळतात. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पर्यटक इथे वाघांना जिवंत प्राणी खायला देतात. जास्तीत जास्त वाघांना पर्यटकांकडून कोंबड्या खायला मिळतात.8 / 10या पार्कमधील वाघांचं वजन साधारण २२५ किलोग्रॅमपर्यंत असतं. वाघांची संख्या कमी होऊ नये म्हणून इथे ब्रीडिंग सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या ब्रीडिंग सेंटरच्या मदतीने इथे वर्षभऱात साधारण १०० वाघांचे बछडे जन्म घेतात. 9 / 10ब्रीडिंग सेंटरमध्ये एक वाघ ठेवण्यासाठी आणि त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यासाठी पार्क प्रबंधकाला साधारण ४ हजार डॉलर्स म्हणजे ३ लाख रूपये इतका खर्च येतो. त्यामुळे इथे पर्यटकांकडून तिकीटही जास्त घेतलं जातं.10 / 10ब्रीडिंग सेंटरमध्ये एक वाघ ठेवण्यासाठी आणि त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यासाठी पार्क प्रबंधकाला साधारण ४ हजार डॉलर्स म्हणजे ३ लाख रूपये इतका खर्च येतो. त्यामुळे इथे पर्यटकांकडून तिकीटही जास्त घेतलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications