Tirumala : Gold gloves of worth 3 crores donated silently in the temple
Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 6:00 PM1 / 6Tirumala : तिरूमालाच्या डोंगरावरील मंदिरातील देवता वेंकटेश्वराच्या दिव्य हातांना सजवण्यासाठी एका भक्ताने शुक्रवारी रत्नजडीत सोन्याचे हात दान दिले आहेत. या व्यक्तीने त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यावर हे हात दान केले. या व्यक्तीने हे दान गुप्त पद्धतीने केलं.2 / 6मंदिराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, तिरूमालामध्ये राहणाऱ्या एका परिवाराने तिरूमला तिरूपती देवस्थानचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. वेंकट धर्मा रेड्डी यांच्याकडे हे हात सोपवले आहेत. त्यांनी दान नाव न जाहीर करता केलं आहे.3 / 6या सोन्याच्या हातांचं वजन साधारण ५.३ किलोग्रॅम आहे आणि यांची किंमत ३ कोटी रूपये आहे. हे हात वेंकटेश्वराच्या मूर्तीवर सजवले जातील.4 / 6हे सोन्याचे दागिने भगवान वेंकटेश्वरांना चढवले जातील. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे भक्त गेल्या ५० वर्षापासून तिरूमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वराची पूजा करत आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे भक्तांना मंदिरात येण्यास बंदी होती. तेही कोरोनाने संक्रमित झाले होते. त्यावेळी त्यांनी तिरूपती बालाजी मंदिरा आपल्या आरोग्याबाबत कामना मागितली होती. जी पूर्ण झाली. 5 / 6दरम्यान तामिळनाडूला राहणाऱ्या एका दुसऱ्या भक्ताने आंध्र प्रदेशच्या तिरूमालामधील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात जवळपास २ कोटी रूपयांचे सोन्याचे शंख आणि चक्र दान केले. यांचं वजन ३.५ किलोग्रॅम आहे.6 / 6तिरूपती मंदिरात नेहमीच सोन्याचे दागिने दान दिले जातात. त्यामुळे हे मंदिर दानाच्या बाबतीत सर्वात श्रीमंत आहे. दरवर्षी लाखो लोक इथे भगवान वेंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications