Tomb of Anarkali made by Salim aka Jahangir in Lahore
भारतात नाही तर 'इथे' सलीमने बनवला होता अनारकलीचा मकबरा, वाचा कुठे आहे अनारकलीची कबर.. By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:23 PM1 / 5प्रेम तर सगळेच करतात, पण इतिहासाच्या पानांवर अशा काही प्रेमकथा नोंदवलेल्या आहे ज्या वर्तमानातच काय तर भविष्यातही लक्षात ठेवल्या जातील. यात लैला-मजनू, शीरीं-फरहाद, रोमिओ-ज्युलिएट आणि हीर-रांझा या अमर प्रेमकथांचा समावेश आहे. यात एक प्रेमकथा सलीम आणि अनारकली यांचीही आहे. ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. कारण सलीमच्या वडिलांनी अनारकलीला भींतीत पुरलं होतं. चला जाणून घेऊ सलीमने अनारकलीचे अवशेष कुठे दफन केले होते.2 / 5मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनारकलीचं खरं नाव नादिरा बेगम होतं. तिला शर्फुन्निसा या नावानेही ओळखलं जात होतं. असं म्हणतात की, नादिरा बेगम ईराणहून लाहोर व्यापाऱ्यांसोबत आली होती. नादिरा आपल्या सुंदरतेसाठी दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होती. तिच्या सौंदर्यामुळे सलीम तिच्या प्रेमात पडला. एका इतिहासकाराने लिहिलं की, अनारकलीच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या गुलाबी रंगामुळे तिचं अनारकली हे नाव पडलं.3 / 5William Finch (एक ब्रिटिश प्रवाशी) जो १६०८ आणि १६११ दरम्यान लाहोरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात लिहिलं की, अनारकली अकबरच्या पत्नींपैकी एक होती. तेच Syed Abdul Lateef नावाच्या इतिहासकाराने आपल्या पुस्तकात लिहिलं की, अनारकली अकबराचं मन खूश करणारी एक महिला होती. अकबरने राजकुमार सलीमसोबत अनैतिक संबंधाच्या आरोपात तिला जिवंत लाहोरच्या किल्ल्यात भींतीत पुरलं होतं. 4 / 5मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा सलीम गादीवर बसला तेव्हा त्याने प्रेयसी अनारकलीच्या नावाने एक मकबरा लाहोरमध्ये बांधला. याच मकबऱ्यात अनारकलीची कबर आहे. या स्थानाला अनारकली नावानेच ओळखलं जातं. अनारकलीच्या कबरेवर सलीमने फारसीमध्ये लिहिलंय की, “यदि मैं केवल एक बार अपनी प्रिय को देख सकता हूं, तो मैं कयामत तक अल्लाह का आभारी रहूंगा.” असं मानलं जातं की सलीमने अनारकलीचे अवशेष इथेच दफन केले होते. पण त्याचा काही ठोस पुरावा नाही.5 / 5हा एक सुंदर मकबरा आहे. जो काही प्रमाणात आग्र्यातील ताजमहालासारखा बनवण्यात आला होता. या मकबऱ्यात एक हॉल आहे. यात ८ दरवाजे आहेत. सोबतच वरच्या मजल्यावर ८ खिडक्या आहेत. आतच अनारकलीची कबर आहे. ज्यावर अल्लाहचे ९९ नावे लिहिली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications