शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खा...प्या... आणि फक्त झोपा... 'हे' जगातील सर्वात जास्त झोपा काढणारे प्राणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:24 PM

1 / 11
झोप आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. वेळोवेळी झालेल्या अनेक संशोधनातूनही दररोज आठ तासांची झोप आवश्यक असते असं सिद्ध झालं आहे. आपण अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी अनेक उपाय करत असतो. कधी ट्रेन किंवा बसमध्ये अपूर्ण झोप पूर्ण करतो तर ऑफिसमध्येच एखादी डुलकी काढून झोप आवरती घेतो. साधारणतः असं सांगण्यात येतं की, सामान्य माणूस आपल्या आयुष्यातील एक तृतियांश वेळ हा झोपण्यात घालवतो. प्राण्यांच्या बाबतीत मात्र झोपेचे प्रमाण थोडं विचित्र आहे. सर्वात जास्त झोपणारा प्राणी हा 24 तासांपैकी 22 तास झोपतो. तेच सर्वात कमी झोपणारा प्राणी म्हणजेच जिराफ हा फक्त दोनच तास झोपतो. आज जाणून घेऊया सर्वात जास्त झोपणाऱ्या प्राण्यांबाबत...
2 / 11
जगभरातील सर्वाधिक झोप घेणाऱ्या प्राण्यांमध्ये कोआलाचा (Koala) पहिला क्रमांक लागतो. दिवसाच्या 24 तासांपैकी हा प्राणी 22 तास झोपतो.
3 / 11
तपकिरी वटवाघूळ (Brown Bat) दिवसाच्या 24 तासांपैकी जवळपास 20 तास झोपतं.
4 / 11
जायंट अर्माडिलू (Giant Armadillo) हा साधारणतः खवल्या मांजराप्रमाणे दिसतो. हा दिवसातील 19 तास झोपतो.
5 / 11
नॉर्थ अमेरिकन ओपस्सम (North American Opossum) हा प्राणी मुख्यतः उत्तर अमेरिकेमध्ये आढळून येतो. हा दिवसातले 18 तास झोप काढतो.
6 / 11
सापाची प्रजाती असणारा हा पायथॉन (Python) मुख्यतः आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडांमध्ये आढळून येतो. दिवसातील 24 तासांपैकी हा जवळपास 18 तास झोपतो.
7 / 11
नाइट मंकीला (Night Monkey) आऊल मंकी म्हणूनही ओळखण्यात येते. हा दिवसातील 17 तास झोपा काढतो.
8 / 11
मानवाचं नवजात बाळ (Human Baby) दिवसातील 24 तासांपैकी तब्बल 16 तास झोपतं.
9 / 11
सर्वात जास्त झोपणाऱ्या प्राण्यांमध्ये वाघाचाही (Tiger) समावेश होतो. वाघ दिवसातील 16 तास झोपतो.
10 / 11
ट्री श्रीव (Tree Shrew) हा प्राणी मुख्यतः दक्षिण आशियाई देशांमध्ये आढळून येतो. हा जवळपास 16 तास झोपतो.
11 / 11
आपल्या सर्वांनाच आवडणाऱ्या खारूताईचाही (Squirrel) सर्वात जास्त झोपणाऱ्या प्राण्यांमध्ये समावेश होतो. ती जवळपास 15 तास झोपते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेwildlifeवन्यजीव