शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वात महागडे फूड्स; एका प्लेटच्या किंमतीत येईल आलिशान कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:34 PM

1 / 6
जगातील सर्वात महागडे फूड्स कोणते आहेत? हे सांगणे बहुतेक लोकांना कठीण जाईल, कारण जगातील सर्वात महागड्या पदार्थांमध्ये अशी अनेक नावे आहेत, जी दुर्मिळ मानली जातात. अनेक फूड्सच्या एका थाळीची किंमत लाखो रुपये असते आणि ते खाणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. आज आम्ही तुम्हाला जगातील 5 सर्वात महागडे फूड्स आणि त्यांच्या किमतींबद्दल सांगत आहोत.
2 / 6
अल्मास कॅविअर (Almas Caviar) हा जगातील सर्वात महागडे फूड्स मानले जाते. यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, कॅविअर स्टर्जन माशांच्या अंडाशयात आढळणाऱ्या अंड्यांना अल्मास कॅविअर म्हणतात. अल्मास कॅविअरची भारतीय रुपयात किंमत सुमारे 29 लाख रुपये (USD 34500) प्रति किलोग्रॅम आहे. हे कॅविअर इराणी बेलुगा स्टर्जन माशापासून मिळते, ज्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. इराणजवळील कॅस्पियन समुद्राच्या स्वच्छ भागांमध्ये बेलुगा स्टर्जन माशांची दुर्मिळ प्रजाती आढळून आल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे.
3 / 6
केशरची (Saffron) गणना जगातील सर्वात महागड्या फूड्समध्ये केली जाते. केशर हा एक प्रकारचा मसाला आहे, ज्याची अनोखी चव आणि सुगंध त्याला खास बनवतो. अनेक भारतीय पदार्थांमध्येही केशर वापरले जाते. केशराचा सुगंध लोकांना खूप आवडतो. रिपोर्ट्सनुसार, एक ग्रॅम केशरची किंमत सुमारे 1600 रुपये आहे. या पद्धतीने पाहिले तर एक किलो केशराची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे. केशर सामान्यतः इराणमध्ये घेतले जाते आणि जगभर वापरले जाते.
4 / 6
ब्लूफिन टूना (Bluefin Tuna) माशाची गणना जगातील सर्वात महागड्या फूड्समध्ये केली जाते. माशांची ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. ब्लूफिन टूना हा जपानच्या सुशी आणि साशिमी फूड्सचा प्रमुख भाग आहे. ब्लूफिन ट्यूनाचे वजन सुमारे 200-250 किलो असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्लूफिन ट्यूनाची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे, परंतु लिलावात त्याची किंमत करोडो रुपयांपर्यंत पोहोचते. यावर्षी जपानमध्ये 212 किलो वजनाच्या ब्लूफिन माशाचा 2.27 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला.
5 / 6
तुर्कीमध्ये आढळणारा एक अनोखा एल्विश मध (Elvish Honey) देखील फूड्सच्या या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा मध तुर्कीमधील आर्टविन शहरातील 1,800 मीटर खोल गुहेतून काढला जातो. या मधात मधमाशांचे पोळे नसते. एल्विश मध नैसर्गिकरित्या जंगली फुलांच्या परागकणांमधून गोळा केला जातो आणि नंतर गुहेत द्रव म्हणून प्रक्रिया केली जाते. एल्विश मधाची किंमत 4.44 लाख रुपये प्रति किलो आहे.
6 / 6
इबेरिको हॅम (Iberico Ham) हा काळ्या डुकराच्या मागच्या पायाचा भाग आहे, जो जगातील सर्वात महागड्या फूड्सपैकी एक आहे. हे 24 ते 36 महिन्यांपर्यंत परिपक्व होते आणि पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये तयार केले जाते. प्रक्रिया केल्यानंतर हे मांस खारट बनवले जाते, वाळवले जाते आणि तीन वर्षांसाठी साठवले जाते. इबेरिको हॅमची किंमत सुमारे 3.75 लाख रुपये आहे. गुणवत्तेनुसार त्याची किंमत कमी-अधिक असू शकते. हे पातळ तुकड्यांमध्ये सर्व्ह केले जाते.
टॅग्स :foodअन्नJara hatkeजरा हटके