शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'भन्नाट' लँडस्केप फोटोग्राफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 3:44 PM

1 / 11
आपल्या पृथ्‍वीवर अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण आपण ती काही-ना-काही कारणांमुळे पाहू शकत नाही. मात्र, तिच ठिकाणे फोटोंच्या माध्यमातून फोटोग्राफर आपल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून देतात. अशाच फोटोग्राफरची जागतिक लँडस्केप फोटोग्राफर स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामधील काही निवडक फोटो...
2 / 11
हा फोटो दक्षिण अमेरिकेच्या डच कॅरिबियनमधील बोनायर बेटाचा आहे. फोटोग्राफर सँडर ग्राफ्टने हे मीठाचे पर्वत आपल्या कॅमेर्‍यावर टिपले.
3 / 11
बॅडलँड्स नॅशनल पार्क अमेरिकेच्या ओटा राज्यात पसरले असून सुमारे हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेले आहे. याचा फोटो डेव्हिड स्विन्डलर यांनी काढला आहे.
4 / 11
कॅनडाच्या अल्बर्टा प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यानंतर कॅनेडियन रॉकीजचे एक सुंदर फोटो दिसत आहे. फोटोग्राफर ग्रेग बोर्टीन यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे.
5 / 11
फोटोग्राफर स्टॅस बर्ट्निकस यांनी हा फोटो काढला आहे. हा फोटो अलास्कामधील डेनाली नॅशनल पार्कचा आहे.
6 / 11
ब्राझीलमध्ये असलेल्या लेनकॉइस मारनहिसंसमधील समुद्रात अंड्युलेटिंग वाळूचे बरेच पर्वत आहेत. फोटोग्राफर इग्नासिओ पलासियोस यांनी हा फोटो काढाला आहे.
7 / 11
हा फोटो ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स प्रांतातील ब्लू पर्वतमधील लिंकन रॉकचा आहे. फोटोग्राफर बेंजामिन मेज यांनी हा फोटो टिपला आहे.
8 / 11
ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेस असलेला पिंक सॉल्ट लेक जगभरातील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. फोटोग्राफर मॅट बीट्सन यांनी या सुंदर लेकचा फोटो काढला आहे.
9 / 11
फोम फक्त साबणामध्येच नाही तर बर्फात देखील आहे. बर्फाचे फुगे असलेला हा फोटो रोमेनियाच्या रेटजेट नॅशनल पार्कमध्ये फोटोग्राफर नेजर ओविडीयू यांनी टिपला आहे.
10 / 11
फोटोग्राफर वेइयाओ पन यांनी हा फोटो दक्षिण पूर्व अलास्कामध्ये टिपला आहे. यामध्ये आइसबर्गचे सौंदर्य पाहू शकता.
11 / 11
हा फोटो अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागातील आहे. फोटोग्राफर थोरस्टे शेहुएरमॅन यांनी आपल्या कॅमेर्‍यावर कैद केला आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके