tourist get thrilling experience in gg lion sanctuary south Africa where tourist are put in the cage
या ठिकाणी तुम्हाला सोडलं जातं थेट सिंहाच्या पिंजऱ्यात! नतर जे होतं त्याला तुम्हीच जबाबदार... By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 6:14 PM1 / 10South Africa मध्ये असणाऱ्या एका प्राणीसंग्रहालयात (GG lion sanctuary)येणाऱ्या लोकांना अत्यंत थरारक असा अनुभव दिला जातो. इथे येणाऱ्या लोकांना थेट सिंहासमोर (Lions) पिंजऱ्यात बंद केलं जातं. 2 / 10दक्षिण अफ्रिकेतील Harrismith येथे असलेल्या प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या पिंजऱ्यात बंद केलं जातं. हा पिंजरा तिथेच असतो जिथे सिंह असतात.3 / 10पर्यटक उलट पिंजऱ्यात सिंह येण्याची वाट पाहतात. GG Lion Sanctuary मध्ये येणाऱ्या लोकांना हा असा अत्यंत थरारक अनुभव मिळतो.4 / 10हा पिंजरा एका जाड काचेचा बनलेला असतो. सिंहाने कितीही प्रयत्न केला, तरी तो ती काच तोडून आत जाऊ शकत नाही.5 / 10५३ वर्षांच्या फोटोग्राफर सुझेन स्कॉट (Suzanne Scott) यांनी सिंहाचे अतिशय जवळून दिसणारे फोटो याच पिंजऱ्याच्या आतून काढले होते.6 / 10या वेगळ्या, भन्नाट अन् थरारक अनुभवात सिंह आणि पर्यटकांच्या सुरक्षेततेची विशेष काळजी घेतली जाते.7 / 10जर्मनीच्या प्रोफेशनल फोटोग्राफरने (German professional photographer) हा पिंजरा दान केला होता. जर्मनी टीव्ही शोने सिंहांचा व्हिडीओ शूट करण्यावेळी हा पिंजरा इथे ठेवून त्यानंतर तो इथेच दान केला. 8 / 10हा पिंजरा प्लेक्सिग्लासने (plexiglass) बनलेला आहे.9 / 10या पिंजऱ्यात पर्यटकांना कोणाताही धोका पोहचू नये म्हणून हा काचेचा पिंजरा दररोज एका इंजिनियरकडून तपासला जातो, जेणेकरुन यावर ठेवलं जाणारं वजन आणि काचेची मजबूती, ताकद दोन्ही ठरवता येईल. 10 / 10पर्यटकांना सिंह इतक्या जवळून पाहण्याची संधी देणारं हे जगातील पहिलंच प्राणीसंग्रहालय असावं. लोक पिंजऱ्यात उभं राहून सिंहाला अतिशय जवळून पाहू शकतात. त्याचे फोटो काढू शकतात. अनेकदा सिंह या पिंजऱ्यावर उभं राहून पायाने हा पिंजरा उघडण्याचाही प्रयत्न करतात. फोटोग्राफर्ससाठी मात्र ही सिंहाचा बेस्ट फोटो काढण्याची उत्तम संधी असते. आणखी वाचा Subscribe to Notifications