शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 12:46 PM

1 / 8
ब्रिटनमध्ये समलैंगिक मुलाने उपचारादरम्यान आपल्या आईची हत्या केली. आरोपीची आई आपल्या मुलाला या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. बारबरा डेली बॅकलॅंडची तिच्या मुलाने हत्या केल्यानंतरही अनेक वर्षांपासून यावर वाद पेटला आहे.
2 / 8
५१ वर्षी महिलेला तिचा मुलगा एंटनीने लंडन येथील घरात किचनमध्ये चाकूने वार करत मारले. एंटनी घटनास्थळी आढळून आला होता. बारबरा मुलाच्या हल्ल्यानंतर लगेच मरण पावली होती. पण तिच्या मृत्यूने लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता की, एक मुलगा आपल्या आईला का मारेल?
3 / 8
हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा एंटनी आपल्या आई-वडिलांपासून वेगळा झाल्यावर आपल्या अमेरिकन आईसोबत राहू लागला होता.
4 / 8
घटस्फोट घेतल्यावर बारबराला समजलं होतं की, तिचा २१ वर्षीय मुलगा समलैंगिक आहे आणि त्यांच्या नात्याने एक नवं वळण घेतलं. त्याच्या आईने कथितपणे त्याला ठीक करण्याच्या प्रयत्नात वेश्येची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
मुलगा एंटनीसोबत संबंध ठेवण्यासाठी त्याच्या आईने वेश्येला कामावर ठेवलं. पण जेव्हा हा प्रयत्न फेल झाला तेव्हा ती स्वत: त्याच्यासोबत झोपू लागली होती. दरम्यान ती मुलाला तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी मनवत होती आणि जेव्हा त्याने ऐकलं नाही तर ती त्याच्यासोबत जबरदस्ती करू लागली.
6 / 8
यादरम्यान एंटनीमध्ये पॅरानॉयड सिजोफ्रेनियाची लक्षणे आढळून आली. पण त्याच्या वडिलांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देण्यास मनाई केली. ज्याबाबत त्यांचं मत होतं की, हे एक अनैतिक काम आहे.
7 / 8
त्याच्या व्यवहाराने परिवार आणि मित्रांमध्ये चिंता निर्माण केली होती. अखेर जेव्हा एका डॉक्टरने एंथनीला चेक केलं तेव्हा डॉक्टरांनी बारबराला इशारा दिला होता की, तिचा मुलगा कुणाची हत्याही करू शकतो. पण त्याच्या आईने डॉक्टरांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं.
8 / 8
ठीक दोन आठवड्यांनंतर एंटनीने आपल्या आईची हत्या केली होती. हत्येनंतर एंटनीला ब्रॉडमूर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ही घटना १९७२ मधील आहे आणि ८ वर्ष तरुंगात राहिल्यावर १९८० मध्ये त्याला तुरूंगातून सोडण्यात आलं होतं. समलैंगिकतेबाबत अजूनही या प्रकरणाची चर्चा ब्रिटनपासून ते अमेरिकेपर्यंत होते.
टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारीhistoryइतिहासInternationalआंतरराष्ट्रीय