Twin sisters reunite for the first time on their 36th birthday viral
३६व्या वाढदिवसावर जन्मानंतर पहिल्यांदा एकमेकींना भेटल्या जुळ्या बहिणी, फोटो झाले व्हायरल... By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 10:58 AM1 / 10अनेक सिनेमांमध्ये अशा कथा बघायला मिळतात की, बालपणी वेगळे झालेले जुळे भाऊ किंवा बहिणी अनेक वर्षांनी अचानक एकमेकांना भेटतात. जरा विचार करा प्रत्यक्षात अशी घटना घडली तर काय होईल. अशीच एक घटना समोर आली आहे. दोन जुळ्या बहिणी एकमेकींना त्यांच्या ३६व्या वाढदिवसाला पहिल्यांदा भेटल्या आहेत. 2 / 10डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही कहाणी दक्षिण कोरियातील दोन बहिणींची आहे. या दोन्ही बहिणींना अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या परिवारांनी दत्तक घेतलं होतं. दोन्ही बहिणी जन्मानंतरच वेगळ्या झाल्या होत्या. 3 / 10दोन्ही बहिणींचं नाव मौली सिनर्ट आणि एमिली बुशनेल आहे. दोन्ही बहिणींना याची माहिती नव्हती की, त्या जुळ्या आहेत. तसेच त्यांना त्यांचा पार्श्वभूमीबाबतही काही माहीत नव्हतं. या दोघींची ही भेट त्यांच्या जन्मानंतरची पहिली भेट आहे.4 / 10दोघींना नुकतीच एकमेकींबाबत माहिती मिळाली. ही माहिती त्यांना एक कॉमन मित्राकडून मिळाली. त्यानंतर त्या भेटल्या आणि त्यांची भेट व्हायरल झाली. दोघींही ही कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. 5 / 10दोन्ही बहिणींसाठी हे समजणं ही त्या जुळ्या आहेत हे मोठं सरप्राइज होतं. भेटल्यानंतर दोघींनी त्यांचा ३६वा वाढदिवस एकत्र साजरा केला. 6 / 10सिनर्ट आणि एमिलीचे भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या भेटीदरम्यान बुशनेलची ११ वर्षीय मुलगी इसाबेलही उपस्थित होती. बुशनेलला पेंसिल्वेनियाच्या एका यहूदी परिवाराने दत्तक घेतलं होतं. बुशनेलची ११ वर्षीय मुलगी इसाबेल हीनेच एकदा आईच्या पार्श्वभूमीबाबत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.7 / 10रिपोर्ट्सनुसार, इसाबेलने सांगितले की, मला डीएनए टेस्ट करायची होती आणि हे बघायचं होतं की, आईकडून माझा काही परिवार आहे की नाही. मी डीएनए टेस्ट करायला गेली. तेच सिनर्टने सुद्धा डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.8 / 10आता दोघी बहिणी भेटल्या आहेत. रिपोर्टमध्ये बहिणींबाबत फार जास्त माहिती दिली गेली नाही. आणि त्यांच्या पार्श्वभूमीबाबतही फार काही सांगण्यात आलं नाही. पण दोघींची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.9 / 10आता दोघी बहिणी भेटल्या आहेत. रिपोर्टमध्ये बहिणींबाबत फार जास्त माहिती दिली गेली नाही. आणि त्यांच्या पार्श्वभूमीबाबतही फार काही सांगण्यात आलं नाही. पण दोघींची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.10 / 10आता दोघी बहिणी भेटल्या आहेत. रिपोर्टमध्ये बहिणींबाबत फार जास्त माहिती दिली गेली नाही. आणि त्यांच्या पार्श्वभूमीबाबतही फार काही सांगण्यात आलं नाही. पण दोघींची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications