Two snakes caught fighting for female in Australia
बाबो! नागिणीसाठी आपसात भिडले दोन नाग, पण दोघांच्या भांडणात नागीण पसार... By अमित इंगोले | Published: September 21, 2020 4:28 PM1 / 12प्राण्यांमध्ये मादीला इम्प्रेस करण्यासाठी दोन प्राणी एकमेकांशी लढताना आपण पाहिलंय. वाघही वाघिणसाठी एकमेकात भांडतात. या लढाईत जे वरचढ ठरतात मादी त्यांची होते. नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये दोन पायथन सापांची लढाई झाली. या लढाईचे फोटो समोर आले आहेत. हे दोन्ही नर अजगर एका मादीसाठी भांडत होते. (Image Credit : Brisbane North Snake Catchers and Relocation Facebook)2 / 12या लढाईत दोन्ही अजगर जखमी झाले. पण तोपर्यंत मादी तेथून पसार झाली. दोन्ही एका घराच्या सीलिंगवर लढाई करत असताना सीलिंग तोडून खाली पडले. या घराच्या मालकाने एनिमल रेस्क्यू टीमला घरी बोलवलं. दोन्ही साप पकडून नेण्यात आले.3 / 12newsweek.com वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ब्रिस्बेनमधील आहे. इथे राहणारा डेविड टॅट आपल्या घरी आराम करत होता. तेव्हाच अचानक किचनमधून सीलिंग पडण्याचा आवाज आला. जेव्हा तो तिथे पोहोचला तिथे दोन अजगर आपसात भांडत असल्याचे दिसले.4 / 12हे दोन्ही साप किचनमधील टेबलवर आपसात भिडले होते. दोघेही एकमेकांना चावत होते. दोघेही भांडताना या व्यक्तीच्या बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्ये पोहोचले होते.5 / 12दोन्ही साप फारच मोठे होते. यातील एक लांबी ९ फूट ५ इंच तर दुसऱ्याची ८ फूट २ इंच होती. हे दोन्ही साप पकडण्यासाठी स्वीवन ब्राउनला बोलवण्यात आलं. त्यानंतर हे दोन्ही साप जंगलात सोडण्यात आले.6 / 12स्टीवनने सांगितले की, हे दोन्ही अजगर एका मादीसाठी भांडत होते. लढाई दरम्यान दोघेही सीलिंग तोडून घरात पडले होते. पण या घटनेतील सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या दोन सापांच्या भांडणात मादी कुठे गायब झाली काही पत्ता लागला नाही.7 / 12स्टीवनने सांगितले की, दोन्ही अजगर इतके मोठे होते की, त्यांना पकडण्यासाठीही वेळ लागला. दोघांमध्ये बराचवेळ संघर्ष सुरू होता. यादरम्यान मादी तिथून पसार झाली.8 / 12सापांना घरी पोहोचवून स्वीटनने टॅटच्या घराचा शोध घेतला. त्याने तिथे सापांचा घर शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते काही सापडलं नाही. छत आणि सीलिंगवरही त्यांना तिसऱ्या सापाचा पत्ता लागला नाही.9 / 12स्टीवननुसार, टॅट फारच नशीबवान होता की, अजगरांनी त्यांना काही नुकसान पोहोचवलं नाही. सामान्यपणे मादीसाठी लढताना अजगर फारच आक्रामक होतात. जवळ आलेल्या कुणालाही ते नुकसान पोहोचवू शकतात.10 / 12ऑस्ट्रेलियात साप खूप जास्त आढळतात. इथे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सापांचा प्रजननाचा काळ असतो. अशात साप बाहेर येऊन मादी आणि खाण्याचा शोधात बाहेर पडतात.11 / 12ऑस्ट्रेलियन रेप्टाइल पार्कनुसार, ऑस्ट्रेलियात दरवर्षी तीन हजार साप कापले जाण्याच्या घटना समोर येतात. विषारी सापामुळे व्यक्तीचे ब्लड सेल्स बेकार होतात. शरीरात क्लॉट्स पडतात. अशात अनेक मृत्यू होतात.12 / 12ऑस्ट्रेलियन रेप्टाइल पार्कनुसार, ऑस्ट्रेलियात दरवर्षी तीन हजार साप कापले जाण्याच्या घटना समोर येतात. विषारी सापामुळे व्यक्तीचे ब्लड सेल्स बेकार होतात. शरीरात क्लॉट्स पडतात. अशात अनेक मृत्यू होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications