शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक असं हॉटेल ज्याचा बार आहे एका देशात तर बेडरूममध्ये दुसऱ्या देशात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 6:24 PM

1 / 8
जगभरात असे अनेक हॉटेल्स आहेत जे त्यांच्या खास सेवांमुळे, सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. या हॉटेल्सची बनावटही आलिशान आहे. पण तुम्ही कधी अशा हॉटेलबाबत ऐकलंय का जिथे बेडवर कड जरी फेरला तर लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात? ही काही गंमत नाही खरं आहे. या हॉटेलचं नाव आहे अर्बेज हॉटेल.
2 / 8
या हॉटेलला अर्बेज फ्रांको-सुइसे हॉटेल नावानेही ओळखलं जातं. हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंडच्या सीमेवर ला क्योर भागात आहे. अर्बेज हॉटेल दोन देशांच्या सीमेच्या मधोमध आहे. त्यामुळे या हॉटेलचे दोन पत्ते आहेत. या हॉटेलची सर्वात खास बाब म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंडची सीमा या हॉटेलच्या मधोमध आहे. अशात या हॉटेलच्या आत जाताच लोक एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात.
3 / 8
अर्बे हॉटेलचं विभाजन दोन्ही देशांची सीमा लक्षात घेऊन करण्यात आलं आहे. तुम्ही वाचून आश्चर्य वाटेल की, या हॉटेलचा बार स्वित्झर्लॅंडमध्ये आहे तर बाथरूम फ्रान्समध्ये आहे.
4 / 8
या हॉटेलमधील सर्व रूम्सना दोन भागात विभागण्यात आलं आहे. रूम्समध्ये डबल बेड अशाप्रकारे सजवण्यात आले आहे की, ते अर्धे फ्रान्समध्ये तर अर्धे स्वित्झर्लॅंडमध्ये आहेत. सोबतच रूम्समध्ये उशाही दोन्ही देशांच्या हिशोबानेच वेगवेगळ्या आहेत.
5 / 8
हे हॉटेल ज्या ठिकाणावर आहे ते ठिकाण १८६२ मध्ये अस्तित्वात आलं होतं. तेव्हा तिथे एक किराणा दुकान होतं. नंतर १९२१ मध्ये जूल्स-जीन अर्बेजे नावाच्या व्यक्तीने हे ठिकाण विकत घेतलं आणि तिथे हॉटेल सुरू केलं.
6 / 8
आता हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंड या दोन्ही देशांची ओळख बनलं आहे. पर्यटकांमध्ये हॉटेल फार लोकप्रिय आहे.
7 / 8
आता हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंड या दोन्ही देशांची ओळख बनलं आहे. पर्यटकांमध्ये हॉटेल फार लोकप्रिय आहे.
8 / 8
आता हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लॅंड या दोन्ही देशांची ओळख बनलं आहे. पर्यटकांमध्ये हॉटेल फार लोकप्रिय आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके