Unique night club in Argentina was vibrating with Sanskrit songs
भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका! By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 2:18 PM1 / 6सामान्यपणे कोणत्याही नाइट क्लबमध्ये हिंदी, पंजाबी किंवा इंग्रजी गाण्यांवर लोक ठेका धरतात. पण तुम्हाला जर कुणी सांगितलं की, एका नाइट क्लबमध्ये चक्क संस्कृत गाण्यांवर लोक थिरकायला लागतात तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना! पण हे खरं आहे.2 / 6भारतापासून दूर एक असा देश आहे जिथे एक अनोखा नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये संस्कृत गीतांवर लोक नाचू लागतात. इतकेच नाही तर तल्लीन होतात.3 / 6या देशाचं नाव आहे अर्जेंटिना. येथील राजधानी ब्यूनस-आयर्समध्ये ग्रोव नावाचा एक नाइट क्लब आहे. यात गणेश शरणम, गोविंदा-गोविंदा, जय-जय राधा रमन हरी बोल आणि जय कृष्णा हरे सारखी गाणी वाजवली जातात.4 / 6तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ब्यूनस-आयर्समधील हा नाइट क्लब लहान नाइट क्लब नाही. हा एक मोठा नाइट क्लब असून इथे एकत्र ८०० लोक तुम्हाला नाचताना दिसतील. (Image Credit : Social Media)5 / 6भारतातील एक अॅम्बेसेडर विश्वनाथन २०१२ मध्ये अर्जेंटिनाला गेले होते आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले होते. त्यांनी सांगितले की, त्या नाइट क्लबमध्ये ना दारू मिळत ना कुणी धुम्रपान करताना दिसत. (Image Credit : भारतातील एक अॅम्बेसेडर विश्वनाथन २०१२ मध्ये अर्जेंटिनाला गेले होते आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले होते. त्यांनी सांगितले की, त्या नाइट क्लबमध्ये ना दारू मिळत ना कुणी धुम्रपान करताना दिसत. (Image Credit : Social Media)6 / 6इतकेच नाही तर या नाइट क्लबमध्ये ड्रग्सवर बंदी आहे आणि मांसही खाल्लं जात नाही. इथे केवळ सॉफ्ट ड्रिंक्स फळांचा ज्यूस आणि शाकाहारी जेवण मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications