शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात पर्यावरण रक्षण! २५ कोटींचं घर संपूर्ण बदलंल फक्त झाडासाठी, पाहा या घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 3:55 PM

1 / 10
मध्यप्रेदशच्या छतरपूरमधील महतो कुटुंबानं एका झाडाला वाचवण्यासाठी आपल्या 25 कोटींच्या इमारतीत अनेक बदल केले.
2 / 10
दहा वर्षांपूर्वी त्यांनी हे झाड लावलं होतं. हे झाड म्हणजे आपल्याच कुुटुंबातील एक सदस्य असल्याचं ते मानत होते.
3 / 10
दहा वर्षांपूर्वी त्यांनी हे झाड लावलं होतं. हे झाड म्हणजे आपल्याच कुुटुंबातील एक सदस्य असल्याचं ते मानत होते.
4 / 10
महतो कुुटुंबीयांच्या या प्रयोगाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
5 / 10
शहरातीत तिठ्यावर असणाऱ्या इमारतीच्या छतावर हे झाड उगवल्यासारखं दिसतं. त्यामुळे येणाजाणाऱ्यांना अश्चर्य वाटतं. इमारतीच्या छतावर एवढं मोठं झाड कसं उगवलं, असा प्रश्न लोकांना पडतो.
6 / 10
प्रशांत महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार झाडाचं मूळ हे जमिनीतच आहे. त्याचं खोड दोन मजले उंच आहे. तर त्याची पानं तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरूून दिसतात.
7 / 10
त्यामुळे लोकांना हे झाड गच्चीवर उगवलं आहे, असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थित वेगळीच आहे.
8 / 10
मालती महतो या दहा वर्षांपूर्वी हे रोप घेऊन आल्या होत्या. त्यावेळी फारसा विचार न करता घराच्या मध्यभागी ते लावण्यात आलं होतं.
9 / 10
मात्र त्यानंतर इमारत पाडून पुन्हा बांधण्याचा निर्णय झाला. मात्र तरीही झाडाला धक्का लागू न देण्याचा निर्णय कुटुंबानं घेतला.
10 / 10
अगोदर घर छोटं होतं. मात्र त्यानंतर ते डेव्हलप करून दोन शोरुमही तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी हे झाड तोडण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता. मात्र हे झाड न तोडता इमारत बांधायचा निर्णय कुटुंबानं घेतला.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके