शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

6 मुलींचा बाप असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीने केलं 24 वर्षांच्या मुलीशी लग्न; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 9:57 AM

1 / 8
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून एक अजब घटना आता समोर आली आहे. जिथे 6 मुलींचा बाप असलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीने 24 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर याने लग्नात जोरदार डान्सही केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 / 8
हुसैनपूर गावात ही घटना घडली आहे. जिथे 6 मुली, जावई आणि नातू असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या वयापेक्षा 41 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या वरातीत जोरदार डान्सही केला. रविवारी पार पडलेला हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
3 / 8
नकछेद यादव असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा विवाह नंदिनी नावाच्या तरुणीशी झाला आहे. या व्यक्तीला 6 मुली आहेत ज्यांचे त्याने लग्न लावून दिलं आहे. यानंतर तो एकाकी जीवन जगत होता. त्यामुळे खूप अस्वस्थ झाला. आपल्या एकटेपणावर मात करण्यासाठी त्याने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.
4 / 8
रविवारी दोघेही अयोध्यातील रुदौली विधानसभेत असलेल्या मां कामाख्या मंदिरात नातेवाईकांसह पोहोचले आणि हिंदू रितीरिवाजांनुसार सप्तपदी घेऊन विवाहसोहळा पार पडला. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
5 / 8
लग्नात लोकांनी आनंदाने जल्लोष केला आणि फुलांचा वर्षाव केला. या लग्नात नकछेद यादव यांच्या सर्व बहिणींनी विधी पार पाडले. लग्नावेळी यादव यांची मोठी मुलगीही उपस्थित होती. यादव यांचे धाकटे बंधू संत प्रसाद यादव व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने लग्नाला पोहोचून विवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले.
6 / 8
विवाह सोहळा पार पडल्यानंतर नकछेद यादव यांनी सांगितले की, एकाकीपणा दूर व्हावा म्हणून त्यांनी नंदिनीशी लग्न केले आहे. नुकतेच ते काही वैयक्तिक कामानिमित्त रांचीला गेले होते. तेथे त्याची नंदनीशी भेट झाली आणि दोघांमधील प्रेमसंबंध वाढले.
7 / 8
दोघांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. रविवारी दोघांनी मिळून मातेच्या मंदिरात सप्तपदी घेतले. विशेष म्हणजे लग्न झालेल्या व्यक्तीला सहा मुली आहेत, ज्यांचे त्याने लग्न केले आहे. त्यानंतर वयाच्या या टप्प्यावर आपल्याला आधाराची गरज असल्याचे त्याला वाटले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 8
दोघांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. रविवारी दोघांनी मिळून मातेच्या मंदिरात सप्तपदी घेतले. विशेष म्हणजे लग्न झालेल्या व्यक्तीला सहा मुली आहेत, ज्यांचे त्याने लग्न केले आहे. त्यानंतर वयाच्या या टप्प्यावर आपल्याला आधाराची गरज असल्याचे त्याला वाटले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :marriageलग्न