upsc cse 2019 topper chandrajyoti singh air 28 know her upsc journey strategy
जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली By ravalnath.patil | Published: November 25, 2020 12:58 PM1 / 102019 मध्ये यूपीएससी परीक्षेत 28 वा क्रमांक पटकावणाऱ्या चंद्रज्योती सिंह अवघ्या 22 वर्षांचा आहेत. इतक्या लहान वयात एवढे मोठे यश मिळवण्यासाठी त्या आपली आवड आणि आपली रणनीती खास असल्याचे मानतात. चला तर मग जाणून घेऊया चंद्रज्योती सिंह यांच्या विषयी...2 / 10चंद्रज्योती यांचे आई-वडील दोघेही लष्करात होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या आई-वडिलांनी लष्करात राहून देशाची सेवा केली आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होणे ही देशाची सेवा करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आई-वडील भारतातील अनेक शहरांमध्ये राहत होते, त्यामुळे चंद्रज्योती यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यात गेले.3 / 10चंद्रज्योती यांना लहानपणापासूनच क्विझिंग आणि चर्चासत्र आवडत होते. त्या आपल्या शाळेत एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीमध्ये पुढे असत. ज्यावेळी त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले, त्यावेळी पालकांनी त्यांना पूर्ण समर्थन दिले. 2018 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफंस कॉलेजमधून हिस्ट्री ऑनर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.4 / 102018 मध्ये पदवीनंतरच त्यांचा आयएएस तयारीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. चंद्रज्योती यांनी सांगितले की, मी पहिल्या पाच महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केला. यावेळी दोन भागात तयारी सुरू केली. 5 / 10पहिल्या भागात जीएस, दुसऱ्या भागात ऑप्शनची तयारी सुरू केली. यानंतर रात्रीच्या वेळी वर्तमानपत्र वाचण्यासाठी एक ते दोन तासांचा वेळ असायचा. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुमारास मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीजद्वारे तयारीवर जोर दिली.6 / 10चंद्रज्योती यांनी स्वत: अभ्यास करून आयएएसची तयारी केली. याबाबत त्यांनी सांगितले की, 'मी माझी स्ट्रेटजी आणि रिर्सोस दोन्हीही साधे आणि मर्यादित ठेवले होते. इतिहास हा पर्यायी विषय होता. त्यामुळे इतिहासाची तयारी करण्यावर जास्त भर दिला. दिवसातील 6 ते 8 तास तयारी करत होती. त्यानंतर परीक्षेच्या काही दिवसाआधी दहा तास ते बारा तास तयारी करण्यात जात होते.'7 / 10याचबरोबर, चंद्रज्योती यांनी आयएएसची तयारी करताना ऑनलाईन साइट्स, पुस्तके आणि चालू घडामोडींसाठी ऑनलाइन रिर्सोसेसची मदत घेतली. यानंतर उत्तर लेखनाचा सराव सुरू केला. यासह, त्यांनी आपल्या तयारीच्या नोट्स बनविणे कधीही सोडले नाही. तसेच, या नोट्स पुन्हा पुन्हा उजळनी करण्याची आपली तयारी सुरूच ठेवली होती.8 / 10चंद्रज्योती या मॉक टेस्टला खूप महत्वाचे मानतात. त्या म्हणतात की, याद्वारे आपण परीक्षेसाठी आपले मन तयार करू शकतो. तसेच, प्रेजेंस ऑफ माइंड सुद्धा डेव्हलप केले जाऊ शकते. प्रीलिम्ससाठी त्यांनी अनेक मॉक टेस्ट दिल्या. 9 / 10जवळपास 50 मॉक टेस्ट त्यांनी दिल्या. यानंतर मुलाखतीच्या तयारीसाठी सुद्धा त्या मॉक टेस्ट आवश्यक असल्याचे सांगतात. चंद्रज्योती यांनी आधी परीक्षांची तयारी केली. परंतु प्रिलिम्सच्या दोन महिने आधी त्यांनी केवळ यावरच लक्ष केंद्रित केले. त्यानंतर मेन्ससाठी टेस्ट सीरीज ज्वाइन केले. कधीही त्यांनी अभ्यास करताना कंटाळा येऊ दिला नाही. 10 / 10चंद्रज्योती म्हणतात की, 15 दिवसातून एकदा मी स्वत: अभ्यासापासून पूर्णपणे लांब राहत होते. या दिवशी मित्रांसोबत एखादा चित्रपट किंवा आवडीची कादंबरी वाचण्यात वेळ घालवत असे. स्वत: ला ब्रेक देणे देखील खूप महत्वाचे आहे, अन्यथा आपल्याला तयारी दरम्यान खूप स्ट्रेस येण्याची शक्यता असते. आणखी वाचा Subscribe to Notifications