The village is situated underground; Everything from home-shops to hotels to the underground
अजबच! जमिनीखाली वसलाय हा गाव; घर-दुकानांपासून हॉटेलपर्यंत सारे काही अंडरग्राऊंड By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 2:17 PM1 / 8सर्वसाधारणपणे गाव हे नदीकिनारी, जमीन किंवा पर्वतांवर वसवले जातात. मात्र या जगात असा गाव आहे तो जमिनीखाली वसलेला आहे. येथे सर्व ग्रामस्थ हे भूमीगतच राहतात. येथील घरे, दुकाने, हॉटेल, मॉल एवढेच काय चर्चसुद्धा अंडरग्राऊंड आहेत. 2 / 8दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये स्थित असलेल्या या गावाचे नाव कूबर पेडी आहे. येथील बहुतांश लोक हो अंडरग्राऊंड घरांमध्ये राहतात. येथे ओपलच्या अनेक खाणी आहेत. बहुतांश अंडरग्राऊंड सिस्टिम खोदकामाच्या हेतूनेच विकसित करण्यात आल्या होत्या. मग खाणीमधील काही मजुरांनी यामध्ये काही खोल्या बनवून येथेच राहण्यास सुरुवात केली. 3 / 8जमिनीखाली असलेली ही घरे पूर्णपणे फर्निश आणि सर्व सुखसुविधांनी युक्त आहे. अशा प्रकारची येथे १५०० घरे आहेत. येथे अनेक हॉलिवूड चित्रपटांचे चित्रिकरण होत असते. 4 / 8येथे मायनिंगचे काम १९१५ मध्ये सुरू झाले होते. कुबर पेडी हा एक वाळवंटी भाग आहे. त्यामुळे येथे उन्हाळ्यामध्ये तापमान खूप अधिक आणि थंडीमध्ये खूप कमी तापमान असते त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असे. 5 / 8त्यामुळे या विषम वातावरणावर तोडगा म्हणून लोकांना मायनिंगनंतर रिकामी उरलेल्या खाणीमध्ये हलवण्यात आले. उन्हाळ्यामध्ये येथील तापमान १२० डिग्री फॅरनहाइटपर्यंत पोहोचते. तसेच इथे पाऊसही कमी पडतो. 6 / 8या शहरामध्ये जागोजागी जमिनीतून बाहेर आलेल्या चिमण्या आहेत. तसेच अनेक साईन बोर्ड लागलेले आहेत. त्या माध्यमातून लोकांना सावधगिरीचा इशारा दिला जातो. 7 / 8विशेष बाब म्हणजे या अंडरग्राऊंड घरांमध्ये इंटरनेट, इलेक्ट्रिसिटी, पाणी यासारख्या सुविधा आहेत. जर काही नसेल तर केवळ सूर्याचा प्रकाश पुरेसा येतो. ही घरे एवढी सुख सुविधांनी युक्त असतील याची कल्पना बाहेरून करू शकत नाही. 8 / 8येथे एक अंडरग्राऊंड हॉटेलसुद्धा आहे. तिथे तुम्ही १५० डॉलर देऊन रात्र घालवू शकता. येथील सुपरमार्केटसुद्धा मोठे आहे. येथे जमिनीखालीच काही चांगले क्लबसुद्धा आहेत. तिथे तुम्ही पूलचा खेळही खेळू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications