Village with hidden temple found after 100 years
शंभर वर्षापासून गायब होतं हे गाव, जंगलात अशा स्थितीत आलं आढळून By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 4:09 PM1 / 10नुकतंच लोकांसमोर एक असं गाव आलं ते गेल्या शंभर वर्षापासून गायब होतं. हे गाव जंगलात हरवलं होतं. आजपर्यंत ज्यांनी हे गाव पाहिलं होतं त्यातील कुणीही जिवंत नाही. त्यामुळे या गावाबाबत लोकांनी फक्त कथांमध्ये ऐकलं होतं. 2 / 10लोक म्हणाले की, त्यांचे आजोबा या गावाबाबत त्यांना कथा सांगत होते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की, हे गाव खरंच आहे. असं सांगितलं जातं की, शंभर वर्षाआधी या गावात अनेक कामगार राहत होते. ते सगळे मायनिंगचं काम करत होते. पण जेव्हा मायनिंग बंद झालं, तेव्हा त्यांनी ते गाव सोडलं. हळूहळू हे गाव जंगलातील झाडांमध्ये दडून गेलं. 3 / 10यूकेच्या वेल्सच्या नटले व्हॅलीमध्ये हे गाव वसलेलं आहे. हे गाव शंभर वर्ष लोकांच्या नजरेपासून दूर होतं. आता पुन्हा ते समोर आलं आहे. इथे घरांच्या मधे मधे मोठी झाडे लावली आहेत. सोबतच स्टीम इंजिनही सापडले, जे खराब झाले आहेत.4 / 10सोशल मीडियावर या गावाचे फोटो व्हायरल होत आहेत. या गावात मंदिरही सापडलं. हे मंदिर कंबोडियाच्या अंगकोर वट संबंधित मानलं जात आहे. 5 / 10कधीकाळी हे गाव मायनिंग इंडस्ट्रीमुळे गर्दीचं ठिकाण होतं. पण आता इथे केवळ झाडी आणि खराब झालेल्या मशीन्स पडल्या आहेत.6 / 10त्यावेळी पाणी खेचण्यासाठी वॉटर व्हील्सऐवजी याठिकाणी एक स्टीम इंजिन लावण्यात आलं होतं. जेणेकरून कामगारांवर जास्त भार पडू नये.7 / 10शंभर वर्षानंतर या गावात जंगलाने आपल्या ताब्यात घेतलं. पण आता हे गाव सापडल्यावर इथे टूरिस्ट्स गर्दी होण्याची चिंता आहे. 8 / 10हे गाव वेल्सच्या घाटांच्या फार आत आहे. याच्या बाहेर आजही बरेच लोक राहतात. पण या गावाच्या केवळ कथाच शिल्लक राहिल्या होत्या.9 / 10भलेही हे गाव लोकांच्या नजरेपासून दूर होतं. पण आजही या गावाची खासियत लोकांना माहीत आहे. बरेच लोक या गावाची सुंदरता बघायला येऊ शकतात.10 / 10असं सांगितलं गेलं की, या ठिकाणी आल्यावर असं वाटतं जणू वेळ थांबला आहे. सगळं काही शंभर वर्षाआधीसारखं दिसतं. इथे एक टेलिफोन बूथही आढळला. आणखी वाचा Subscribe to Notifications