Village of women in Brazil on covid times where men not allowed api
इथे पुरूषांना प्रवेश नाही! एक असं गाव जिथे राहतात केवळ सुंदर महिला...पण पुरूषांसाठी खास नियम... By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:52 PM1 / 11जगभरात वेगवेगळी आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. यातच एसं गाव आहे जिथे केवळ महिलांनाच राहण्याची परवानगी आहे. या गावात राहणाऱ्या काही महिला विवाहित आहेत. पण त्यांचे पती गावाच्या नियमानुसार दुसरीकडे राहतात. या गावाची सगळी व्यवस्था महिलांच्या हातात आहे. 2 / 11कोरोना व्हायरसचा अमेरिकेत आणि यूरोपमध्ये जास्त प्रभाव नव्हता तेव्हा फेब्रुवारीमध्ये या महिलांनी गाव क्वारंटाइन केलं होतं. गावात कुणालाही येऊ दिलं जात नव्हतं. चला जाणून घेऊ या गावाची खासियत.3 / 11फार सुंदर आहेत येथील महिला - या अनोख्या गावात 600 महिलांची घरे आहेत. याची व्यवस्था त्या स्वत: करतात. मीडियात या गावाबाबत जी माहिती त्यानुसार या गावातील महिला फार सुंदर आहेत आणि जास्तीत जास्त महिला अविवाहितच आहेत. ब्राझीलच्या दक्षिण पूर्वेत असलेल्या गावाचं नाव आहे नॉइवा डो कॉर्डिएरो. 4 / 11विवाहित महिला कशा राहतात? - या गावात राहणाऱ्या काही महिला विवाहित आहेत. पण त्यांच्या पतीला आणि 18 वयापेक्षा अधिक असलेल्या मुलाला गावात राहण्याची परवानगी नाही. या महिलांचे पती दुसरीकडे राहतात आणि केवळ विकेंडला या गावात येऊ शकतात.5 / 11महिला करतात काय? - या गावातील महिला शेतीपासून ते घरातील सगळी कामे करतात. मिळून मिसळून राहणाऱ्या महिलांनी इथे एक कम्युनिटी हॉल तयार केलाय. जिथे त्या सर्व एकत्र येऊन टीव्ही बघू शकतात. इथे मोठ्या टीव्हीची व्यवस्था आहे. 6 / 11हे गाव तयार कसं झालं यामागे एक कहाणी आहे. 1891 मध्ये मारिया सेन्हॉरिना डी लीमा नावाच्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला गावातून काढण्यात आले होते. तिने या ठिकाणी राहणे सुरू केले होते. तिच्यासोबत सोडल्या गेलेल्या किंवा एकट्या महिलाही राहत होत्या. अशाप्रकारे हे गाव वसत गेलं.7 / 11पुरूषांना बंदी का? - या गावात पुरूषांचं शासन चालणार नाही, यामागेही एक कहाणी आहे. 1940 मध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरू या गावात आले आणि त्यांनी येथील एका मुलीसोबत लग्न केल्यावर चर्चची स्थापना केली. त्यानंतर त्याने इथे पितृसत्ताक व्यवस्था सुरू करण्यास सुरूवात केली. महिलांवर मद्यसेवन, संगीत ऐकणे, केस कापने आणि गर्भनिरोधक वापरण्यावर बंदी घालू लागला.8 / 11पण जेव्हा 1995 मध्ये त्याचं निधन झालं तेव्हा महिलांनी निश्चय केला की, आता त्या गावात पुरूषाचा अधिकार चालू देणार नाही. त्यानंतर महिलांनी फादरने सांगितलेले सगळे नियम मोडले.9 / 11पण पुरूषांची ओढ तर होतीच - कितीही नाही म्हटलं तरी महिलांना पुरूषांची ओढ होतीच. याचाच विचार करून या समुदायातील महिलांनी काही नियम तयार केले. (Image Credit : telegraph.co.uk)10 / 112014 मध्ये हे गाव जगभरात तेव्हा चर्चेत आलं जेव्हा येथील काही महिलांनी अविवाहित पुरूषांकडून प्रेमाची मागणी केली होती. तेव्हा 23 वर्षीय नेल्माने सोशल मीडियात म्हटले होते की, येथील सुंदर महिला पुरूषांसाठी आतुर आहेत.11 / 11नेल्माच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'इथे ज्या पुरूषांना आम्ही मुली भेटतो ते एकतर आमचे नातेवाईत असतात किंवा विवाहित असतात. इथे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. बराच काळ झाला मी एखाद्या पुरूषाला किस केलं नाही. आम्ही मुली प्रेम आणि लग्नासाठी आतुर आहोत. पण आम्ही इथे राहणं सोडू शकत नाही. कारण इथे राहणं आम्हाला आवडतं. पतीसाठी हे गाव सोडता येणार नाही'. आणखी वाचा Subscribe to Notifications