Viral News: Chinese man has been living at the airport for 14 years
Viral News: 14 वर्षांपासून विमानतळावर राहतोय हा व्यक्ती; घरी जाण्यास देतो नकार, जाणून घ्या कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:38 PM1 / 8 तुम्हाला कधी विमानतळावर फ्लाइटची वाट पाहण्याची संधी मिळाली असेल, तर हा अनुभव किती वेगळा असतो, हे तुम्हाला नक्की माहीत असेल. विमानतळावर अनेक प्रकारची लोकं बघायला मिळतात. 2 / 8 काही प्रवासी त्यांच्या पहिल्या प्रवासाबद्दल उत्सुक असतात, तर अनेकजण खाणे, पिणे आणि खरेदी करताना दिसतात. तर काही प्रवाशांना लवकर फ्लाइटमध्ये बसायचे असते. पण तुम्ही कधी विमानतळावर मुक्काम केल्याचे ऐकले आहे का?3 / 8 चीनमधील एक व्यक्ती कुटुंबापासून दूर राहण्यासाठी गेल्या 14 वर्षांपासून बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहतोय. वेई जिआंगुओ असे या व्यक्तीचे नाव असून, त्या 2008 पत्नीशी भांडण झाल्यानंतर घर सोडले होते. 4 / 8 तेव्हापासून तो बीजिंग इंटरनॅशनल एअरपोर्टवर बस्तान मांडून बसला आहे. या विमानतळावर तीन टर्मिनल आहेत, हा व्यक्ती टर्मिनल 2 मध्ये राहतो. सुरुवातीच्या काही काळात त्याने रेल्वे स्थानकावरही दिवस काढले आहेत.5 / 8 या बेरोजगार माणसाला विमानतळावर राहणे आवडते. तो म्हणतो की, इथे तो त्याच्या इच्छेनुसार खाऊ-पिऊ शकतो. त्या व्यक्तीने 'चायना डेली'ला सांगितले की, तो कधीच घरी परतणार नाही, कारण त्याला त्याच्या घरात हवे तसे स्वातंत्र्य मिळत नाही.6 / 8 त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सांगितले आहे की, घरी राहायचे असेल तर सिगारेट आणि दारू सोडावी लागेल. असे केले नाही तर कुटुंबाला दरमहा 1 हजार युआन (सुमारे 12 हजार रुपये) द्यावे लागतील. सगळे पैसे घरी दिल्यावर स्वतःसाठी सिगारेट आणि दारू कशी विकत घेणार? यामुळेच त्या व्यक्तीला घरी जायचे नाही.7 / 8 त्या व्यक्तीचे घर विमानतळापासून अवघ्या 19 किमी अंतराव आहे. त्याने आपल्या घरातून आणलेल्या इलेक्ट्रिक कुकरच्या सहाय्याने विमानतळावरच स्वतःसाठी छोटेसे स्वयंपाकघर तयार केले आहे. तो व्यक्ती कुठलीही नोकरी करत नसून, सरकारकडून मिळणाऱ्या 1 हजार युआनच्या भत्त्यावर जगतो.8 / 8 जिआंगुओ विमानतळावर राहणारे एकमेव व्यक्ती नाहीत. यापूर्वी इराणमधील मेहरान करीमी नासेरी हे निर्वासित होते, जे पॅरिस चार्ल्स डी गॉलमधील टर्मिनलवर 18 वर्षे राहीले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications