शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो! मुली सोडून सेक्स डॉलच्या प्रेमात पडला; साखरपुड्यात हिऱ्याची अंगठी अन् आयफोनही दिला गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 17:54 IST

1 / 7
प्रेम आंधळं असतं हे अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. प्रेमात लोकांना वय, जातपात काहीही दिसत नाही. काही देशांमध्ये आता समान लिंगांच्या प्रेमसंबंधांनाही मंजूरी मिळाली आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा माणसाबद्दल सांगणार आहोत. ज्याच्याबद्दल ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. कारण या माणसाला प्लास्टीकच्या बाहुलीशी प्रेम झालं आहे. स्वतःसाठी या माणसानं ही डॉल विकत घेतली आहे. तिच्यासोबत राहता राहता त्याला जाणवलं की हीच आपल्या आयुष्यातील खरं प्रेम आहे. म्हणून त्यानं चक्क या बाहूलीशी साखरपुडाच केला आहे.
2 / 7
वॅलेंटाईनच्या पहिल्या आठवड्यात ही लव्ह स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. ही घटना हाँग काँगमधून समोर आली आहे. या ठिकाणच्या रहिवासी असलेला ३६ वर्षीय टियानरोंगनं मुलीच्या प्रेमात पडण्याऐवजी सेक्स डॉलशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 7
इतकंच नाही तर आपल्या नव्या पार्टनरला त्यानं महागडे गिफ्ट्ससुद्धा दिले आहेत. ज्यात आयफोन्ससह कपडे आणि चपलांचा समावेश आहे.
4 / 7
विशेष म्हणजे या माणसानं आतापर्यंत या बाहूलीला किस केलेले नाही. किस केल्यानं तिची त्वचा खराब होईल असं त्याला वाटतं.
5 / 7
शाई आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. त्याला अनेक वर्षांपासून सेक्स डॉलमध्ये रस होता. पण त्यावेळी किंमत जास्त असल्यामुळे शाई सेक्स डॉल खरेदी करू शकला नव्हता.
6 / 7
ऑनलाईन सर्च करून आपल्या बजेटनुसार त्यानं एक सेक्स डॉल विकत घेतली. या डॉलसोबत त्याला खूप चांगलं वाटत होतं म्हणून त्यानं तिच्याशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला.
7 / 7
शाईच्या मते डॉलशी लग्न करणं एखाद्या मुलीशी लग्न किंवा साखरपुडा करण्यच्या तुलनेत सोपं आहे. कारण डॉल सगळ्या गरजा पूर्ण करते याशिवाय भांडतही नाही. एकटं वाटू नये म्हणून शाईनं ही डॉल विकत घेतली होती. हळूहळू या डॉलची कंपनी आवडायला लागल्यामुळे शायनं या डॉलसह लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Image credit- Asianetnews)
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल