Viral News: Mysterious flame in Jawala devi temple, after seeing the miracle Akbar had donated gold
Viral News: रहस्यमयी आहे 'या' मंदिरातील ज्योत, चमत्कार पाहून अकबराने दान केले होते सोने By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 1:16 PM1 / 9 हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ज्वाला देवी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कालीधर टेकडीवर देवीला समर्पित हे मंदिर आहे. 'जाता वाली माँ' अशीही या मंदिराची ओळख आहे.2 / 9 याच ठिकाणी माता सतीची जिह्वा(जीभ) पडल्याचे सांगितले जाते. पांडवांनी या मंदिराचा शोध लावला होता. या मंदिराशी संबंधित काही खास रहस्येदेखील आहेत. 3 / 9 हिमाचल प्रदेशातील या शक्तीपीठात वर्षानुवर्षे 9 नैसर्गिक ज्वाला धगधगत आहेत. या ज्वालांचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत असल्याचे सांगण्यात येते.4 / 9 9 किलोमीटर खोदूनही शास्त्रज्ञांना ते ठिकाण सापडले नाही जिथून नैसर्गिक वायू बाहेर पडतो. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधलेले आहे, त्याखालून 9 ज्वाला निघतात.5 / 9 या 9 ज्वाला चंडी, हिंगलाज, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, विंद्यावासिनी, सरस्वती, अंबिका, अंजीदेवी आणि महाकाली या नावाने ओळखल्या जातात.6 / 9 ज्वाला देवी मंदिर हे मंदिर सर्वप्रथम राजा भूमी चंद यांनी बांधले होते. नंतर महाराजा रणजित सिंग आणि राजा संसारचंद यांनी 1835 मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.7 / 9 मुघल राजा अकबराने या मंदिरातील 9 अखंड ज्वाला विझवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मात्र तो या ज्वाला विझवण्यात अपयशी ठरला. 8 / 9 या ज्वालाबाबत अकबराच्या मनात अनेक शंका होत्या, या विझवण्यासाठी त्यांने पाणी ओतण्याचा आदेश दिला होता. तसेच, कालव्याला ज्वालांच्या दिशेकडे वळवण्याचेही आदेश दिले, पण हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.9 / 9 अखेर देवीच्या मंदिराचा चमत्कार पाहून त्यांनेही हार मानली आणि या चमत्काराला प्रसन्न होऊन तिथे सोन्याचे छत्र अर्पण केले होते. मात्र, देवी मातेने ते स्वीकारला नाही आणि काही दिवसानंतर सोन्याचे छत्र खाली पडले, असे सांगितले जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाहीत.) आणखी वाचा Subscribe to Notifications