viral news you can buy home only for 75 rupees in cinquefrondi italy
खरं की काय? फक्त ८५ रुपयात 'या' कोरोनामुक्त गावात घर विकत घेऊ शकता, 'अशी' आहे खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:01 PM1 / 6कोरोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या माहामारीने जगभरातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. इटलीतील सिंक्यूफोंडी या गावातील मेअर मिशेल कोनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. स्वस्त घरांच्या किंमतीबाबत त्यांनी सांगितले की, लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा किमती ठेवल्या आहेत.2 / 6सिंक्यूफोंडी गाव समुद्रापासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे. याठिकाणी अनेक पर्यटक येतात. या ठिकाणी घर विकत घेत असलेल्या व्यक्तीला काही अटी मान्य कराव्या लागतात. 3 / 6त्या अटी म्हणजे नेहमी घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं, वेळोवेळी घराला रंग देणं या गोष्टी घरमालकाने करायला हव्यात. या गावात चर्च आणि ऐतिहासिक इमारती मोठ्या संख्येनं आहेत. 4 / 6या ठिकाणच्या घरांची किंमत फक्त 85 रुपये इतकी आहे. घर विकत घेतल्यानंतर वर्षाला 280 रुपयांचा वीमा काढावा लागतो. 5 / 6घर विकत घेतल्यानंतर 3 वर्षांच्या आत डागडुजी, नुतनीकरण करण्यात आलं नाही तर 22000 डॉलर म्हणजेच ( जवळपास 16,43,943 रुपये) दंड भरावा लागतो. या गावातील इतर घर खुपच सुंदर आहेत. 6 / 6या ठिकाणच्या रहिवाश्यांनी घरं खूपच सुंदर सजवलेली आहेत. घराच्या शिंड्यांनाही आकर्षक रंग दिला आहे. चारही बाजूंनी हिरवळ असल्यामुळे नैसर्गिक सुंदरतेने बहरलेलं असं हे गाव असून पर्वतांच्या खाली वसलेलं हे गाव आहे. तरिही इतक्या कमी किंमतीत का घरं विकली जातात याबाबत सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. आणखी वाचा Subscribe to Notifications