War of the bucket between the rival city states of bologna and modena api
जेव्हा एका 'बादली'साठी दोन राज्यात झालं होतं मोठं युद्ध, मारले गेले होते 2 हजार सैनिक! By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 3:05 PM1 / 11जगभरात वेगवेगळे मोठमोठे युद्धे झालीत. ज्यात लाखो लोक मारले गेले. इतिहासातील जास्तीत जास्त युद्धांचं एक कॉमन कारण होतं एखाद्या राज्यावर ताबा मिळवणे म्हणजे आपल्या सत्तेचा विस्तार करणे. 2 / 11मात्र, आजपासून साधारण 695 वर्षांआधी एक असं युद्ध झालं होतं ज्याचं कारण होतं एक बादली म्हणजे बकेट. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या भीषण युद्धात 2 हजार पेक्षा जास्त लोक मारले गेले होते.3 / 11ही ऐतिहासिक घटना आहे 1325 मधील. त्यावेळी इटलीमध्ये धार्मिक तणाव फार जास्त होता. येथील दोन राज्य बोलोग्नाला ख्रिस्ती धर्मगुरू पोपचं समर्थन मिळालं होतं. तर मोडेना राज्याला रोमन सम्राटाचं समर्थन मिळाली होतं.4 / 11मुळात बोलेग्नातील लोकांचं असं मत होतं की, पोप हेच ख्रिस्ती धर्माचे खरे गुरू आहेत. आणि मोडेनातील लोक मानायचे की, रोमन सम्राटच खरा गुरू आहे5 / 111296 मध्ये बोलोग्ना आणि मोडेनात एक युद्ध आधीच झालेलं होतं. त्यानंतर दोन्ही राज्यात नेहमीच तणाव होता. 6 / 11असे सांगितले जाते की, रिनाल्डो बोनाकोल्सीच्या शासनकाळात मोडेना फार आक्रामक झालं होतं आणि नेहमीच बोलोग्नावर हल्ले करत होतं. 7 / 11दोन्ही राज्यातील हा तणाव पुढे एका गोष्टीमुळे आणखी वाढला. झालं असं होतं की, 1325 मध्ये मोडेनातील काही सैनिक गपचूप बोलोग्नातील एका किल्ल्यात घुसले होते आणि तिथून एक बादली त्यांनी चोरी केली होती.8 / 11असे म्हणतात की, ही बादली हिरे आणि दागिन्यांनी भरलेली होती. जेव्हा ही बादली चोरी झाल्याची बातमी बोलोग्नाच्या सेनेला समजली तेव्हा त्यांनी मोडेना राज्याला ती बालटी परत करण्यास सांगितले. मात्र, मोडेनाने नकार दिला. याच गोष्टीमुळे दोन्ही राज्यात पुन्हा युद्ध सुरू झालं.9 / 11बोलोग्नाजवळ त्यावेळी 32 हजार लोकांची सेना होती. तर मोडेनाजवळ केवळ सात हजार लोकांची सेना होती. दोन्ही राज्यात सकाळी सुरू झालेलं हे युद्ध मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं. 10 / 11पण आश्चर्याची बाब म्हणजे कमी सेना असूनही या युद्धात मोडेनाचा विजय झाला. या युद्धात दोन हजार सैनिक मारले गेले होते.11 / 11बोलोग्ना आणि मोडेना यांच्या झालेलं हे युद्ध 'वॉर ऑफ द बकेट' किंवा 'वॉर ऑफ द ऑकेन बकेट' म्हणून ओळखलं जातं. आजही ती बकेट एका म्युझिअममध्ये ठेवली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications