Watch How All 6,000 Residents Of This Polish Town Live Together On The Same Street
एकाच रस्त्याच्या आजूबाजूला राहतात या गावातील लोक, आजूबाजूला शेतीत शेती By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 5:36 PM1 / 7जगात अनेक सुंदर गावे आहेत. कुठे डोंगर-दऱ्या आहेत तर कुठे खळखळून वाहणारं नदीचं पाणी आणि घनदाट जंगल आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे सगळे लोक रस्त्याचा आजूबाजूलाच राहतात. सगळी घरे रोडच्या दोन्ही बाजूला लागून बनली आहेत. बाकी सगळी शेतं आहेत. हा नजारा फारच सुंदर दिसतो. (All Image Credit - Social Media)2 / 7सोशल मीडियावर नेहमीच जगातल्या वेगवेगळ्या गावातील फोटो व्हायरल होत असतात. ज्यातून गावातील जगणं, सुंदर निसर्ग बघायला मिळतो. गावातील सगळे लोक एकमेकांना ओळखतात. कुणी डोंगरावर राहतं तर कुणी शेतात घर बांधतं. तर कुणी रोडच्या बाजूला घर बांधून राहतात.3 / 7पण जगात एक असंही गाव आहे जिथे सगळे लोक एकमेकांच्या जवळ तर राहतात, सोबतच त्यांची घरेही मुख्य रस्त्याच्या आजूबाजूलाच बनलेली आहेत. गावातील आजूबाजूच्या जागेवर सगळी शेती आहे. ही घरे एखाद्या झाडाच्या फांदीला पाने असल्यासारखीच दिसतात.4 / 7आम्ही तुम्हाला सांगतोय पोलॅंडमधील गाव सुलोसवाबाबत. हे गाव क्राकोव शहरापासून 30 किलोमीटर उत्तर-पश्चिममध्ये आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, इथे साधारण 6 हजार लोक राहतात.5 / 7या गावाची खासियत ही आहे की, इथे राहणारे लोक एकाच रस्त्याच्या आजूबाजूला राहतात. शेतामधून एक 9 किलोमीटर लांब रस्ता जातो आणि त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी घरे बांधली आहेत. 6 / 72021 मध्ये पहिल्यांदा पोलंडच्या या गावाचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा लोकांनी यांच्या सुंदरतेचं कौतुक केलं होतं. या गावाची सुंदरताच यात आहे की, एकाच रस्त्याच्या आजूबाजूला घरे आहेत आणि बाकी सगळीकडे शेती आहे. 7 / 7या गावाचे वरून घेण्यात आलेले फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. आणि गावाच्या मधून जाणारा रस्ता स्पष्टपणे दिसत आहे. केवळ एकाच रोडच्या आजूबाजूला सगळे लोक राहणारं हे एकुलतं एक गाव आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications