weadding invitation in the What's app style
पाहावं ते नवल! त्यांनी व्हॉट्स अॅप स्टाइलमध्ये छापली लग्नपत्रिका By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 8:37 PM1 / 7लग्नसोहळ्याप्रमाणाेच लग्नपत्रिकाही अविस्मरणीय असावी यासाठी हल्ली वेगवेगळ्या स्टाइलच्या लग्नपत्रिका छापण्याचा ट्रेंड आला आहे. दरम्यान, सूरतमधील आरजू आणि चिंतन यांनी आपल्या विवाहाची पत्रिका चक्क व्हॉट्स अॅपच्या स्टाइलमध्ये छापून घेतली आहे. 2 / 7या पत्रिकेच्या बाह्य आवरणापासून मुख्य निमंत्रण पत्रिकेपर्यंत सर्वत्र सजावट करण्यासाठी व्हॉट्स अॅपवरील विविध फिचरचा वापर करण्यात आलेला आहे. 3 / 7सध्याच्या सोशल मीडियामध्ये व्हॉट्स अॅप हे सर्वाधिक वापरण्यात येते. त्यामुळे आरझू आणि चिंतन यांनी त्याचाच आपल्या लग्नपत्रिकेत खुबीने वापर करून घेतला आहे. निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्टावर व्हॉट्स अॅपसारखे प्रोफाइल पेज दाखवण्यात आले आहे. तसेच प्रोफाइल पिक्चरमध्ये वधु-वरांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. 4 / 7निमंत्रणासाठी चॅटिंगचा वापर करण्यात आला आहे. 5 / 7लग्नपत्रिकेत चॅटिंगचा कलात्मक दृष्टीने केलेला वापर. 6 / 7मला गुजरातीमध्येच पण जरा वेगळी अशी लग्नपत्रिका तयार करायची होती. त्यामधून व्हॉट्स अॅपस्टाइलमध्ये पत्रिका तयार करण्याची कल्पना सुचली, असे आरझू सांगते. 7 / 7व्हॉट्स अॅपवर येणाऱ्या मेसेजचाही विवाहाविषयी माहिती देण्यासाठी खुबीने वापर करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications