शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#Welcome2018 : २०१८ मध्ये हे चित्रपट आहेत रिलीज होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 7:22 PM

1 / 10
सिनेसृष्टीत हुशार दिग्दर्शक म्हणून आपली ओळख बनवलेला निरज पांडे पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याची सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत आणि बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला जमवला आहे. आता त्यांचा आयरे हा चित्रपट येऊ घातला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपायी, रकुल प्रीत सिंग असे चेहरे तुम्हाला यात पहायला मिळणार आहेत. जानेवरीच्या २६ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
2 / 10
चंदा मामा दूर के अंतराळाविषयी माहिती देणारा भारतातील पहिला चित्रपट म्हणून चंदा मामा दूर के या चित्रपटाकडे पाहिलं जातंय. सुशांत सिंग राजपूत, आर.माधवन, श्रद्धा कपूर आणि नवाजुद्दीकीन सिद्दीकी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सुशांत आणि नवाजुद्दीकीन अंतराळवीराची भूमिका बजावणार आहेत तर, माधवन टेस्ट पायलटच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. १९६८ साली हॉलिवूडमध्ये २००१ अ स्पेस ऑडिसी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा चित्रपट तयारर करण्यात आला आहे. २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
3 / 10
हॉकी प्लेअर बलबीर सिंग यांच्या जीवनावर आधारीत असलेला गोल्ड हा चित्रपट येत्या २०१८ वर्षात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. १९४८ साली भारतानं पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकलं होतं. त्यावेळी बलबीर सिंग हे हॉकी टीमचे कप्तान होते. अक्षय कुमार या चित्रपटात एका वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळणार आहे. १५ ऑगस्ट २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 
4 / 10
झोया अख्तरची ड्रामा फिल्म गल्ली बॉय २०१८ च्या मध्यंतरात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. रणविर सिंग आलिया भट या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटातून मुंबईतील वस्ती पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार आहे. 
5 / 10
यावर्षात अक्षय कुमारचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातील एक म्हणजे पॅडमॅन. तामिळमधल्या समाजसेविका अरुणाचलम मुरुगांथम यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. ही एक ड्रामा मुव्ही असून अक्षय कुमार, सोनम कपुर आणि राधिक आपटे तसंच अमिताभ बच्चनही यामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा ठरलाय. २०१८च्या एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 
6 / 10
करण जोहर निर्मित राझी हा चित्रपटही २०१८ मध्ये प्रदर्शित होतोय. आलिया भट, विकी कौशल हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सेहमत या प्रसिद्ध कांदबरीतून राझी या चित्रपटाची कथा घेण्यात आली आहे. १९७१ साली झालेल्या इंडो-पाकिस्तान युद्धात एका काश्मिरी मुलीनं पाकिस्तान युवकाशी लग्न केलं होतं. या प्रसंगावर आधारीत हा चित्रपट मेमध्ये हा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
7 / 10
एस.शंकर यांचा साय-फाय हा मोस्ट अवेटेड चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होतोय. २०१० साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. तो एन्थिरन या चित्रपटाने बॉक्स अ़फिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या चित्रपटाकडूनही तीच अपेक्षा केली जाते. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे रजनिकांत. रजनिकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन असे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. जवळपास ४५० कोटी रुपये बजेट या चित्रपटाचा आहे. टॉलिवूडचे प्रसिद्ध रजनिकांत आणि बॉलिवूडचा अक्षय कुमार यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
8 / 10
यशराज फिल्म्स निर्मित सुई-धागा:मेड इन इंडियन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वरुण धवन, अनुष्का शर्मा ही दोघं मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शारत कटारिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. म. गांधीनी देशाला खादीचं महत्त्व पटवून दिलंय असाच काहीसा उद्देश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. गांधी जयंतीला म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
9 / 10
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारीत दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट  देखील २०१८ साली प्रदर्शित होणार आहे. अनुपम खेर या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. २०१८ शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. विजय रत्नाकर गुत्ते यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. 
10 / 10
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारत रेखाटण्याचा प्रयत्न थग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात करण्यात आला आहे. विजय आचाऱ्या यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अमिताभ बच्चन, अमिर खान, कतरीना कैफ आणि फातिमा सना शेख असे बॉलिवूडमधले दिग्गज कलाकार यामध्ये असल्याने सगळ्यांचच लक्ष याकडे लागून राहिलंय. २०१८ च्या दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 
टॅग्स :bollywoodबॉलीवूडNew Year 2018नववर्ष २०१८Aamir Khanआमिर खानKatrina Kaifकतरिना कैफ