शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जिवंतपेक्षा जास्त खतरनाक असतो मृत व्हेल मासा, मनुष्यांसाठी बनू शकतो मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 4:28 PM

1 / 5
व्हेल एक समुद्री मासा आहे आणि जगातल्या विशाल जीवांपैकी एक आहे. पूर्णपणे विकसित एका व्हेल माशाची लांबी ११० फूट आणि वजन १८० टन पर्यंत असतं. हा मासा इतका विशाल असून मनुष्यांसाठी अजिबात धोकादायक नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की, व्हेल मासा मेल्यावर मनुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
2 / 5
व्हेल माशाचं शरीर फार खतरनाक असतं आणि ते एका बॉम्ब स्फोटाप्रमाणे मनुष्याचं मृत्यूचं कारण ठरू शकतं. पण असं का? चला जाणून घेऊ याचं उत्तर....
3 / 5
व्हेल मासा जेव्हा मरतो तेव्हा समुद्राच्या लाटा त्याचं मृत शरीर किनाऱ्यावर आणतात. अशात जे लोक जिवंत व्हेल बघू शकत नाही ते त्याचा मृतदेह बघण्यासाठी जवळ जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मेलेल्या व्हेलजवळ जाणं खतरनाक ठरू शकतं. कारण मृत व्हेलच्या शरीरात कधीही विस्फोट होऊ शकतो. विस्फोट झाल्याने याचा आजूबाजूला असलेल्या लोकांना धोका होऊ शकतो.
4 / 5
मृत व्हेलच्या शरीरात स्फोट होतो कारण जीव मेल्यावर त्यांच्या शरीराच्या आतील भागांना बॅक्टेरिया खाणं सुरू करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक प्रकारचे गॅस तयार होतात. या गॅसेसमुळे त्यांचं शरीर फुगू लागतं. हीच प्रक्रिया व्हेलच्या आतही होते. व्हेलचा बाहेरचा भाग फार मजबूत असतो. त्यामुळे शरीरातील गॅस बाहेर येत नाही. ज्यामुळे स्फोट होऊ शकतो. अशाप्रकारे बॉडीमध्ये स्फोट होऊन गॅस बाहेर निघतो.
5 / 5
अनेकदा असंही झालं आहे की, कट करताना व्हेलचं शरीर फुटतं आणि मांस बाहेर येऊन अनेक मीटर दूरपर्यंत पसरतं. त्यामुळे बॉडी कट करण्याआधी अनेक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. जेव्हा अनेक टन व्हेलचं शरीर फुटतं तेव्हा स्थिती खतरनाक होते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके