What do hotels do with used soap?
हॉटेलमध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं? उत्तरावर बसणार नाही तुमचा विश्वास... By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 11:58 AM1 / 7जगात असे अनेक प्रश्न असतात जे लोकांच्या मनात येतात, पण त्यांची उत्तरं त्यांना मिळत नसतात. हे प्रश्न आपल्या रोजच्या जीवनातील अगदी सामान्य, पण तेवढेच उत्सुकता वाढवणारे प्रश्न असतात. असाच एक प्रश्न म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथे हॉटेलकडून साबण, टॉवेल वापरण्यास दिला जातो. आता प्रश्न हा आहे की, आपण जर तो त्यांनी दिलेला साबण एक किंवा दोन दिवस वापरला तर नंतर त्या साबणाचं काय होतं? हॉटेलवाले तो साबण दुसऱ्यांना तर वापरायला देत नसतील ना? चला जाणून घेऊ याचं उत्तर...2 / 7सामान्यपणे याचं उत्तर हे साबण किंवा शॅम्पू फेकले जात असतील असं मिळू शकतं. तसेच ज्या वस्तू वापरल्याच नाहीयेत त्या दुसऱ्या ग्राहकांना दिल्या जात असतील. ऐकायला हे खरंही वाटतं. पण हे खरं नाहीये.3 / 7आधी कचऱ्यात फेकत होते - हे तर नक्की आहे की, लाखोंच्या संख्येने असलेल्या हॉटेल्सच्या रुम्समधून रोज अशा वस्तू निघत असतील. ९ वर्षांआधी पर्यंत जास्तीत जास्त हॉटेलवाले या वस्तू कचऱ्यात फेकत होते. म्हणजे दिवसाला हजारो टन कचरा पर्यावरणाचं नुकसान करत होता. यादरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एका रिपोर्ट आला. यात सांगण्यात आलं की, हॉटेलच्या रुम्समधून साबण, शम्पू आणि असेच दररोज वाया जाणारे प्रॉडक्टमुळे एकीकडे कचऱ्यांचा ढिग वाढतोय. तर याचा गरीबांच्या स्वच्छतेची समस्या दूर केली जाऊ शकते.4 / 7दररोज दोन लाखांपेक्षा अधिक साबण-शॅम्पू - २००९ मध्ये काही संस्थांनी एकत्र येऊन एक मोहिम चालवली होती. एका रिपोर्टनुसार, भारतात दररोज लाखोंच्या संख्येने अशा वस्तू हॉटेलबाहेर निघतात. देशात १ ते १.५ लाख हॉटेल रुम आहेत. यावरुन कल्पना करु शकता की, दररोज किती वस्तू बाहेर पडत असतील. 5 / 7आता रिसायकलिंग केलं जातं - या समस्येचं समाधान करण्यासाठी जगभरात 'क्लीन द वर्ल्ड' आणि अशाच काही संस्थांनी मिळून 'ग्लोबल सोप प्रोजेक्ट' नावाचा उपक्रम राबवला. या अंतर्गत अर्धे वापरले गेलेले साबण नवीन साबण तयार करण्यासाठी वापरले जातात. हेच कंडिशनर, शॅम्पू आणि मॉइश्चरायजरसोबत केलं जातं. हे रिसायकल केलेले प्रोडक्ट विकसनशील देशांमध्ये पाठवले जातात.6 / 7गरीबांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन - या उपक्रमाचा अभाव त्या क्षेत्रांमध्ये मिळतो, जिथे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या सुविधांचा अभाव आहे. गरीब देशांमध्ये अस्वच्छतेमुळे अनेक लोक निमोनिया आणि डायरिया या आजाराचे शिकार होत आहेत. रिसायकल केलेले साबण-शॅम्पूने लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन मिळतं. 7 / 7आधी शुद्ध केलं जातं - या उपक्रमाला आता जगभरातील सर्वच देशांमध्ये पाठिंबा मिळत आहे. स्थानिय स्तरावरही अनेक संस्था काम करतात. जे हॉटेलमधील अशा वस्तू एकत्र करतात आणि ते रिसायकल करण्यासाठी पाठवले जातात. रिसायकल दरम्यान साबण, शॅम्पू, किंडश्नर या वस्तू किटाणूरहीत केलं जातं. आणि यांच्या शुद्धतेची चाचणीही केली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications