शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कसं आहे व्हाइट हाऊसमधील रहस्यमय बंकर, ज्यात राष्ट्राध्यक्षांना लपवलं जातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 3:23 PM

1 / 10
अमेरिका हा जगातील सगळ्यात शक्तीशाली देश मानला जातो. त्यासोबतच व्हाईट हाऊस देखील सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचं मानलं जातं. व्हाइट हाऊसमधील बंकर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. कारण ते फारच सुरक्षित मानलं जातं. त्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 10
व्हाईट हाऊसच्या आता हा बंकर असा डिझाइन केलाय की, तो 18व्या शतकातील आयरलॅंडच्या एखाद्या बंगल्यासारखा दिसतो. मोठ्या रूममध्ये सजावट साधी आहे. पण रूम भव्य आहेत. 1791 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनचे आर्किटेक्ट जेम्स हॉबेन यांनी व्हाईट हाऊसचं डिझाइन तयार केलं होतं.
3 / 10
त्यानंतर व्हाईट हाऊस तयार करण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागल होता. 8 वर्षांनंतर 1800 सालात राष्ट्राध्यक्ष जॉन एडम्स इथे पहिल्यांदा आले. 1812 मध्ये युद्धादरम्यान राष्ट्रध्यक्षांच्या हाऊसला आग लावली. त्यानंतर जेम्स हॉबेन यांनी पुन्हा यावर काम केलं.
4 / 10
तसं प्रेसिडेंट हाऊसला व्हाईट हाऊस हे नाव राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांनी 1901 मध्ये दिलं होतं. तेव्हापासून तेच नाव आहे.
5 / 10
आता जरा जाणून घेऊ यातील सीक्रेट बंकरबाबत. या सीक्रेट बंकरची निर्मिती सतत थोडी थोडी सुरू होती. वेगवेगळे युद्ध डोळ्यांसमोर ठेवून याची निर्मिती सुरूच होती. तशी याच्या निर्माणाची नेमकी तारीख नाही. पण व्हाईट हाऊसच्या साइटवर याचा उल्लेख आढळतो की, 1941 च्या डिसेंबरमध्ये पर्ल हार्बरवरील अटॅकनंतर लगेच याची निर्मिती सुरू झाली.
6 / 10
त्यादरम्यान फ्रॅंकलिन रूझवेल्ट राष्ट्राध्यक्ष होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना व्हाईट हाऊस सोडून दुसरीकडे जाण्यास सांगितले. पण राष्ट्राध्यक्षांनी नकार दिला आणि म्हणाले की, इथून जाण्याऐवजी व्हाईट हाऊसमधेच एक गुप्त आणि सुरक्षित ठिकाण तयार करावं.
7 / 10
त्यानंतरच इस्ट विंगमध्ये अशा बंकरची तयारी सुरू झाली होती, ज्यावर बॉम्ब, गोळ्या किंवा कोणत्याही शस्त्रांचा परिणाम होऊ नये. जेव्हा बंकर तयार होत होतं तेव्हा जवळपास रोज रूझवेल्ट ते बघायला तिथे येत होते. त्यांच्याशिवाय कुणालाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती.
8 / 10
रूझवेल्ट यांच्यानंतर अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष Harry S. Truman यांनी या गुप्त व्यवस्थेत आणखी भर टाकली. असे मानले जाते की, हा बंकर इतका मजबूत आहे की, न्यूक्लिअर बॉम्बचाही यावर प्रभाव होत नाही. ईस्ट विंगमध्ये मोठ्या लॉनच्या ठिक खाली हा बंकर तयार केला आहे.
9 / 10
याचदरम्यान या बंकरला President's Emergency Operations Center (PEOC) नाव देण्यात आलं. या गुप्त सुविधेबाबत अमेरिकेतील पत्रकार Garrett Graff यांनी एका पुस्तकात लिहिले आहे. Raven Rock नावाच्या या पुस्तकात सांगण्यात आले आहे की, बंकर 600 स्क्वेअर फूट परिसरात आहे. यात लिव्हिंग रूमसोबतच कमांड रूम, टीव्ही आणि कॉन्फरन्स रूम सुद्धा आहेत. ज्यात 16 लोक बसू शकतात.
10 / 10
9/11 च्या हल्ल्यानंतर आणखी मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवल्यावर त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी याच बंकरमध्ये शरण घेतली होती. यात राष्ट्राध्यक्ष बूश यांच्यासह यूएसचे तत्कालीन उप-राष्ट्राध्यक्ष Dick Cheney हेही होते. तसेच फर्स्ट लेडी लॉरा बूश या सुद्धा होत्या. लॉरा यांनी त्यांच्या Spoken From The Heart या पुस्तकात 9/11 चा उल्लेख करताना या बंकरचाही उल्लेख केला होता.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके