What happens with human after death hiker said after dead for 45 mins
चमत्कार! ४५ मिनिटांनी 'असा' जीवंत झाला मेलेला माणूस; अन् डॉक्टरांना सांगितला अनुभव.... By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 6:44 PM1 / 9मेल्यानंतर काय होतं? आपण कोणत्या दुनियेत असतो ते जाणून घेण्याची उत्सूकता प्रत्येकालाच असते. आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणालाही सापडलेलं नाही. ४५ वर्षांच्या मायकल नॅपिन्स्की या माणसाला एक वेगळाच अनुभव आला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मेल्यानंतर ४५ मिनिटांनी हा माणूस पुन्हा जीवंत झालाआहे.2 / 9मेल्यानंतर कोणी जीवंत झालंय असं तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल तर पण प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की, या माणसाचे ४५ मिनिटांत एकदाही हृदयाचे ठोके सुरू असल्याचे जाणवले नाही. 3 / 9या माणसाचे नातेवाईक मायकलचा मृत्यू झाल्याने दुःखी झाले होते. मायकलच्या जीवंत होण्याने ते आश्चर्यचकित झाले. ४५ वर्षाच्या मायकल नपिन्स्कीने ७ नोव्हेंबरला माऊंट रेनिअर नॅशनल पार्कमध्ये होते. यादरम्यान जास्त बर्फ असल्यामुळे त्यांची त्यांच्या मित्रांपासून ताटतूट झाली.4 / 9जेव्हा पर्वतावरून मायकल परत आले नाही. तेव्हा रेस्क्यू टीम पाठवण्यात आली. बर्फाच्या पर्वतांवर मायकलची शोध सुरू झाला. त्यानंतर एका दिवसानंतर रेस्क्यू टीमला मायकल मृतावस्थेत दिसून आले. 5 / 9हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून मायकलला बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मायकल मृत असल्याचे घोषित करण्यात आले. 6 / 9जवळपास ४५ मिनिटांपर्यंत ही व्यक्ती मृत होती. त्यानंतर डॉक्टरांनी एक्स्ट्राकोर्पोरियल झिल्ली ऑक्सीजनेशन (ईसीएमओ) मशिनपर्यंत पोहोचवले. तरीही डॉक्टरांनी हार न मानता मेलेल्या माणसाला जीवंत करून दाखवले. 7 / 9डॉक्टरांसोबत मायकल यांचे नातेवाईकसुद्धा या घटनेने हैराण झाले होते. मायकलने पुन्हा जीवंत झाल्यानंतर सांगितले की, मृत्यूच्या तोंडातून बाहेर येणं हे एक भयानक स्वप्नाप्रमाणे होते. डॉक्टरांनी मला नवीन जीवदान दिलं आहे. आता मी हे जीवन इतरांना समर्पीत करू इच्छितो. 8 / 9एक्स्ट्राकोर्पोरियल झिल्ली ऑक्सीजनेशन (ईसीएमओ) याच्या साहाय्याने रक्त शरीरातील हृदय, फ्फुफुसंच्या बाहेर मशिनने पंप केलं जातं. याद्वारे कार्बन डायऑक्साईड निघून शरीरात ऑक्सिजनने भरलेले टिश्यूज पाठवले जातात.9 / 9कोरोनाच्या अनेक रुग्णांच्या उपचारांसाठी या पद्धतीचा वापर केला जात आहे. ही खूप महागडी आणि जोखिमीची ट्रिटमेंट आहे. अमेरिकेतील जवळपास २६४ रुग्णालयांमध्येही मशिन आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications